शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

गटनेत्यांसह चौघांना नोटीस

By admin | Published: April 23, 2016 1:18 AM

शिवसेनेतील वाद : पक्षशिस्तीचे बाळकडू देणार - दुधवडकर

गटनेत्यांसह चौघांना नोटीसशिवसेनेतील वाद : पक्षशिस्तीचे बाळकडू देणार - दुधवडकरकोल्हापूर : शिवसेनेचे चारही नगरसेवक नवीन आहेत, त्यांना पक्षशिस्त काय असते हे अजून माहीत नाही म्हणूनच त्यांना पक्षशिस्तीचे बाळकडू देणार आहोत, असे शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांनी येथे सांगितले. दरम्यान, पक्षाच्या अधिकृत भूमिके ला छेद देऊन महानगरपालिका प्रभाग समिती निवडणुकीत विरोधाची भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांना शिवसेनेने शुक्रवारी ‘कारणे दाखवा नोटीस’ दिली. परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर शुक्रवारी कोल्हापुरात आले होते. त्यावेळी दुधवडकर यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणातून गटनेता नियाज खान यांच्या घरावर झालेल्या दगडफेकीची घटना तसेच गेल्या दोन दिवसांपासून उमटलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर संबंधित नगरसेवक, जिल्हाप्रमुख संजय पवार, आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून माहिती घेतली. नियाज खान यांचे चुलते साजिद मेस्त्री तसेच मामा सलिम सय्यद यांनी सकाळी शासकीय विश्रामगृहावर जाऊन दुधवडकर यांची भेट घेऊन चर्चा केली. नियाज राजकारणात नवीन आहे. महापालिकेतील कामकाजाचा अनुभव नाही, त्यामुळे त्यांच्या हातून नकळत चूक झाली आहे म्हणून त्यास माफ करून सांभाळून घ्यावे, अशी विनंती दोघांनी दूधवडकरांना केली. दरम्यान, दुधवडकर यांनी दुपारपर्यंत नियाज खान, अभिजित चव्हाण, प्रतिज्ञा निल्ले यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत चर्चा केली. नगरसेवक राहुल चव्हाण मात्र त्यांना भेटले नव्हते. मात्र, त्यांनी एका लग्नाला गेलो असल्याचा निरोप दिला होता. दुपारी दुधवडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, चारही नगरसेवकांना बाळकडू देण्याची आवश्यकता आहे. पक्षात नवीन आहेत. त्यांना पक्षशिस्त काय असते हे माहीत नाही. त्यामुळे त्यांना पक्षशिस्तीचे बाळकडू द्यावे लागणार आहे. पक्षाचा आदेश न पाळता उलटी भूमिका घेतलेल्या नगरसेवकांना पक्षातर्फे ‘कारणे दाखवा नोटीस’ देण्यात आली आहे, त्यांचा खुलासा आल्यावर कारवाई केली जाईल, असे दुधवडकर यांनी सांगितले. खान यांच्या घरावरील दगडफेकीचे समर्थन करता का? असे विचारले असता दुधवडकर म्हणाले की, दगडफेकीचे समर्थन करता येणार नाही; परंतु शिवसैनिकांच्या भावना तीव्र होत्या. (प्रतिनिधी)

 

शिवसेना नगरसेवक तटस्थच शिवसेना नगरसेवक सभागृहातील कामकाजात तटस्थच बसतील. भाजपने मनपा निवडणुकीत आमच्याशी युती केली नव्हती. त्यावेळी भाजपने निवडणूक स्वतंत्रपणे लढविली. त्यांना शिवसेनेची गरज नव्हती. निवडणुकीनंतर भाजपने परिवहन समिती सभापतिपद देऊ केले होते. मात्र, आता आम्हाला भाजपची गरज नाही. त्यामुळे शिवसेनेचे चार नगरसेवक तटस्थच राहतील, कोणाच्याच बाजूला ते असणार नाहीत, असे दूधवडकर यांनी स्पष्ट केले. प्रसंगी पोलिस फिर्यादी होणारशहरात जर कोण सामाजिक ऐक्य बिघडविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यात पोलिस प्रशासन कडक भूमिका घेईल व प्रसंगी त्यात स्वत: पोलिस फिर्यादी होतील, असे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी शुक्रवारी सांगितले. वाय. पी. पोवार नगर येथील शिवसेनेचे गटनेते नियाज खान यांच्या घरावर गुरुवारी (दि. २१) हल्ला झाला. या प्रकरणी शुक्रवारी कसबा बावडा येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते बोलत होते.कोल्हापूर महानगरपालिका राजकारणात भाजप व ताराराणी आघाडीला पाठिंबा देण्यावरून टीकेचे लक्ष्य बनलेल्या शिवसेना नगरसेवकांना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पक्षशिस्तीचे धडे शिकविल्यानंतर नियाज खान, आ. राजेश क्षीरसागर, मंत्री दिवाकर रावते, जिल्हाप्रमुख संजय पवार, राहुल चव्हाण, महेश उत्तुरे हे सर्व शुक्रवारी एका कार्यक्रमात एकत्र आले.