कोल्हापूर : येथील शेतीमाल सहकारी प्रक्रिया संघाच्या ६ कोटी ८ लाख ५३ हजार रुपयांची थकबाकी व त्यावरील गेल्या पंधरा वर्षांचे व्याजवसुलीसाठी युनियन बँकेच्या राजारामपुरी शाखेने या संस्थेचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांच्यासह संस्थेसह सोळाजणांना शुक्रवारी वसुलीच्या नोटिसा लागू केल्या. संबंधितांनी दोन महिन्यांत ही रक्कम न भरल्यास कर्जापोटी गहाण दिलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा इशारा बँकेने दिला आहे. हे कर्ज २००६ पासून थकीत आहे.
नोटिसा बजावण्यात आलेल्यांमध्ये संजय शामराव पाटील (रा. रुक्मिणीनगर), दिवंगत एस. के. पाटील यांचे कायदेशीर वारस, बळवंत दादा पाटील (हळदी, ता. करवीर), पंडितराव व इंदूबाई महिपती तिवले (रा. कळंबा ता. करवीर), सरस्वती बापूसाे वाळके, पांडुरंग, वसंत, संजय बापूसो वाळके (सर्व रा. निगवे दुमाला ता. करवीर), आप्पासाो दत्तू पाटील (रा. साजणी, ता. हातकणंगले), जयराम कृष्णराव पाटील (रा. कुरुंदवाड), दत्तात्रय धोंडी पाटील (रा. चाफोडी, ता. राधानगरी), रावसो सर्जेराव निकम (मोहिते कॉलनी, कोल्हापूर), सुभाष पाटील (उचगाव, ता. करवीर), बापूसो मारुती पाटील (लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर), कृष्णा यल्लाप्पा शेडबाळे (कुरुंदवाड), अरुणा सर्जेराव पाटील (खोची, ता. हातकणंगले), तेजश्री प्रवीण पाटील (ई वॉर्ड, कोल्हापूर), एस. बी. पाटणकर (शाहू मार्केट यार्ड)
थकीत कर्जरक्कम अशी (व्याजाची थकबाकी १ ऑक्टोबर २०१६ पासून)
१. सीसी जनरल : २ कोटी ३९ लाख (व्याजदर १३.६५ टक्के)
२. सीसी युनियन ट्रेड : १ कोटी ६९ लाख (व्याजदर १४.४० टक्के)
३. फंडेड इंटरेस्ट टर्म लोन : ६४ लाख (व्याजदर ११.२५ टक्के)
४. इतर सिक्युरर्ड टर्म लोन : १ कोटी ३५ लाख (व्याजदर ११.२५ टक्के)