कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ डीओटी वसतिगृह कोरोना सेंटरचे महापालिकेने नियुक्त केलेले विभाग प्रमुख डॉ. प्रकाश पावरा यांना उपायुक्त निखील मोरे यांनी सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. दोन व्हेंटिलेटर वापर होत नसल्याची माहिती वरिष्ठांना का कळविले नाही असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.तीन महिन्यापासून शिवाजी विद्यापीठ डिओटी होस्टेल सेंटर येथे दोन व्हेंटीलेटर वापराविना धूळ खात पडले असल्याचे संभाजी ब्रिगेडकडून रविवारी भांडाफोड करण्यात आला. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यानुसार महापालिकेचे उपायुक्त निखील मोरे यांनी सोमवारी येथील विभाग प्रमुख डॉ. प्रकाश पावरा यांना नोटीस काढली. दोन व्हेंटिलेटर वापर होत नसल्याची पूर्वकल्पना वरिष्ठांना का दिल नाही ही बाब गंभीर असून यामुळे महापालिकेचा नावलौकिकाला बादा निर्माण झाली आहे. यातून सेवेबद्दल बेजबाबदारपणा दिसून येत आहे. यासंदर्भात प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत पाच दिवसात खुलासा करावा.असे म्हटले आहे.चार व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांनादोन व्हेंटिलेटरचा वापर होत नसल्याचे निदर्शनास आणल्यानंतर संभाजी ब्रिगेड यांनी सोमवारी शासनाची चार व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयास दिल्याचा आरोप केला आहे. मास्क नसणाऱ्या नागरिकांवर कारवाई योग्य आहे. पण महापालिकेतील अशा कर्मचार्यांची ही पावती फाडली पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांनी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.