कोल्हापूर : महाराष्ट्रामध्ये दिल्लीसारख्या दर्जेदार शाळा निर्माण करण्याचे स्वप्न पाहणारे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याच जिल्ह्यातील अनेक शिक्षक शाळेतच वेळेवर जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी अशा २० हून अधिक शिक्षकांना गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत नोटीस काढली आहे.शिक्षणाधिकारी उबाळे यांनी १६ मार्चपासून जिल्ह्यात विविध शाळांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे शिक्षकांच्या आग्रहाखातर सकाळच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळी सात ते दुपारी साडेअकरा अशी शाळेची वेळ आहे. मात्र, अनेक ठिकाणी यावेळेत शिक्षकच उपस्थित नसल्याचे उबाळे यांना पहावयास मिळाले. वास्तविक उबाळे या कोल्हापुरातून निघून त्या शाळेपर्यंत जाण्यासाठी आठ, साडेआठ वाजतात. तरीही अनेक शाळा उघडलेल्या नसणे, विद्यार्थ्यांनी शाळा उघडणे, विद्यार्थी दारात येऊन बसणे, असे प्रकार पहावयास मिळाले.जिल्ह्यातील चंदगड, हातकणंगले, करवीर, राधानगरी, भुदरगड तालुक्यात आतापर्यंत त्यांचा दौरा झाला आहे. या सर्व शिक्षकांना गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून नोटीस काढून याबाबत खुलासा मागवण्यात आला आहे. एकीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी ही कडक भूमिका घेतली असताना ज्यांना नोटीस काढली आहे, अशांनी पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून शिक्षकांच्या बाजूने आता काही सदस्य मध्यस्थीसाठी सरसावल्याचेही चित्र पहावयास मिळत आहे.
शाळेत नसणाऱ्या २० हून अधिक शिक्षकांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 7:39 PM
Zp Teacher Kolhapur-महाराष्ट्रामध्ये दिल्लीसारख्या दर्जेदार शाळा निर्माण करण्याचे स्वप्न पाहणारे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याच जिल्ह्यातील अनेक शिक्षक शाळेतच वेळेवर जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी अशा २० हून अधिक शिक्षकांना गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत नोटीस काढली आहे.
ठळक मुद्देशाळेत नसणाऱ्या २० हून अधिक शिक्षकांना नोटीस शिक्षणाधिकारी उबाळे यांचा दणका, सदस्य मध्यस्थीसाठी सरसावले