शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

खराब रस्तेप्रकरणी नऊ ठेकेदारांना नोटिसा

By admin | Published: July 19, 2016 12:37 AM

महापालिकेची कारवाई : चार दिवसांत रस्ते न केल्यास फौजदारी

कोल्हापूर : शहरातील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची करणाऱ्या नऊ प्रमुख ठेकेदारांना महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी नोटीस लागू केली. पावसामुळे चार दिवसांत उखडलेले रस्ते नव्याने करून द्या; अन्यथा फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशाराच या नोटिसीद्वारे देण्यात आल्याने ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत. ९ ते १२ जुलै दरम्यान शहरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरात गेल्या वर्षभरात करण्यात आलेले ५९ रस्ते खराब झाले. अनेक ठिकाणच्या बाजूपट्ट्या वाहून गेल्या, तर काही रस्त्यांचा वरचा थर धुऊन गेला. दायित्व कालावधीतच रस्ते निकृष्ट झाल्यामुळे संतप्त झालेल्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनास धारेवर धरले. महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, आदींनी चारही विभागीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. तसेच जे रस्ते खराब झाले आहेत, त्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असेही आदेश दिले होते. शुक्रवार व शनिवार अशा दोन दिवसांत झालेल्या सर्वेक्षणात शहरातील ५९ रस्ते खराब झाल्याचे आढळून आले. त्याची जबाबदारी ठेकेदारांवर निश्चित करण्यात आली. सुमारे १४ कोटींचा निधी या कामांवर खर्च करण्यात आला होता. रस्त्यांच्या निकृष्ट कामाबद्दल महानगरपालिकेने सोमवारी ठेकेदार अनिल पाटील, बबन पोवार, उत्तम पाटील, महेश भोसले, अमित साळोखे, अनंत कन्ट्रक्शनचे दिलीप काजवे, संगीता कन्ट्रक्शनचे गणेश खाडे, शिवपार्वती कन्स्ट्रक्शनचे कुकरेजा यांना नोटीस लागू केली. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेतल्याने ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत. कामे निकृष्ट केल्याबद्दल ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केल्यानंतरही अधिकाऱ्यांनी अशी कारवाई केली नव्हती. मात्र, महापौर रामाणे तसेच अन्य लोकप्रतिनिधींनी कडक भूमिका घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे नोटीस लागू झाली. (प्रतिनिधी)