शिये येथील लोक महापुराच्या वेळी स्थलांतरित झाले होते. त्यांचे पुनर्वसन सर्वे नं. २५९व २८३ मध्ये व्हावे यासाठी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्याची दखल घेत मंडल अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सदर जागीच मोजणी करण्यात आली; पण काही लोक या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम सुरू असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई ग्रामसेवक, प्रशासक करत नसल्याचे निषेधार्थ ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा शेतकरी संघटनेचेवतीने देण्यात आला होता. अवैध बांधकामे थांबवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाने दिल्याने, हे आंदोलन तात्पुरते थांबवून गायरान जमिनीवरील चालू असणारे बांधकाम प्रशासनाने न थांबल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला होता. त्याची दखल घेत गायरान जमिनीवर बांधकाम सुरू असणाऱ्यांना ग्रामपंचायत अधिनियमांनुसार कारवाई करण्यात येईल, अशा नोटीस दिल्या आहेत.
गायरान जमिनीवर बांधकाम सुरू करणाऱ्यांना शिये ग्रामपंचायतीकडून नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 4:20 AM