शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

जिल्हा बँकेच्या तिघांना नोटीस

By admin | Published: January 26, 2017 12:54 AM

आंधळा कारभार भोवला : ४ लाखांचे ४० लाख करण्याचे प्रकरण

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा परिषद शाखेतील तीन कर्मचाऱ्यांना बँक प्रशासनाने बुधवारी ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली. जिल्हा परिषदेचे ठेकेदार खोत यांनी चार लाखांचा धनादेश भरला असताना त्यांच्या खात्यावर ४० लाख रुपये वर्ग करण्याचे प्रकरण या कर्मचाऱ्यांना अंगलट आले आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ठेकेदार विशाल खोत यांना ४ जानेवारीला ४ लाख ४ हजार २१५ रुपयांचा धनादेश दिला होता. त्यांनी हा धनादेश त्यांचे खाते असलेल्या बँक आॅफ इंडियाच्या शाखेत भरला. तो क्लिअरिंगसाठी जिल्हा बँकेच्या जिल्हा परिषद शाखेत आला. या शाखेतून चार लाखांऐवजी ४० लाख ४२ हजार २१५ रुपये संबंधित ठेकेदाराच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. मूळ रकमेपेक्षा खोत यांच्या खात्यावर ३६ लाख ३७ हजार ८०० रुपये जादा जमा झाले. जिल्हा परिषदेने बँकेतून पासबुक भरून आणल्यानंतर हा प्रकार उघडीस आला आणि प्रशासनाची पळापळ सुरू झाली. त्यांनी बँकेच्या शाखेत चौकशी केली असता नजरचुकीने जादा रक्कम वर्ग झाल्याचे सांगितले. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बँक प्रशासनाने एक पथक जिल्हा परिषद शाखेत पाठविले. त्यांनी चौकशी करून सोमवारी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर बुधवारी शाखाधिकारी विद्या कुलकर्णी, लिपिक विजय अस्वले व ब्रँच अकौंटंट शब्बीर उस्ताद यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे. याबाबत सविस्तर खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. ३६ लाख जिल्हा परिषदेच्या खात्यावर जमाजादा वर्ग केलेले तब्बल ३६ लाख रुपये बुधवारी पुन्हा जिल्हा परिषदेच्या खात्यावर जमा करण्यात आल्याने जिल्हा परिषदेसह जिल्हा बँकेच्या जिल्हा परिषद शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. याबाबत २२ जानेवारीला ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर रविवारी विशाल खोत यांच्याशी संपर्क साधून त्यांना जादा रक्कम तुमच्याकडे आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर जादा आलेले हे पैसे त्यांनी लवकर भरावेत यासाठी पाठपुरावा सुरू झाला. त्यांनी दोन टप्प्यात पैसे भरत बुधवारी संपूर्ण जादा आलेले पैसे भरून टाकले.जिल्हा परिषद शाखेत घडलेल्या घटना गांभीर्याने घेऊन त्याची चौकशी केली. चौकशीमध्ये शाखाधिकारी, लिपिक, ब्रँच अकौंटट दोषी आढळले असून त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. -प्रतापसिंह चव्हाण (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक)