लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील शिवशक्ती पाणीपुरवठा योजना आकुर्ळे, महादेव पाणीपुरवठा माणगाव, चरणाईदेवी पाणीपुरवठा चरण या तीन पाणीपुरवठा योजनांचे आठ कोटी रुपयांचे कर्ज माफ व्हावे या मागणीसाठी शेतकरी गेली पाच वर्षे आंदोलन करीत आहेत. आता तरी आमचा सात-बारा कोरा शासन करणार काय? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. शासनाच्या भूविकास बँकेने शेतकºयांच्या जमिनीच्या लिलावाच्या नोटिसा लागू केल्याने तीन गावांतील शेतकºयांत खळबळ उडाली आहे.शेतीला पाणीपुरवठा व्हावा, उसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात काढले जावे यासाठी आकुर्ळे, माणगाव, चरण या गावांतील शेतकºयांनी एकत्र येऊन पाणीपुरवठा योजना स्थापन केल्या. या तीन गावांतील पाणीपुरवठा योजना विश्वास साखर कारखाना पुरस्कृत आहेत. शेतकºयांनी भूविकास बँकेचे कर्ज काढून स्वत:च्या सात-बारा उताºयावर कर्जाचा बोजा नोंद करून संस्था काढल्या. तीन संस्थांचे सहाशे सभासद आहेत. आकुर्ळे, माणगाव, चरण या तीन गावांतील शेतकºयांचे या पाणी योजनेमुळे सुमारे साडेआठशे एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. मात्र, गेल्या चार वर्षांत उसावर पडलेला मावा, उसाला लागलेली हुमणी, कारखान्याने दिलेला कमी दर, अशा अनेक समस्यांनी शेतकरी अडचणीत सापडला. बँकांचे कर्ज वाढत गेले. त्यामुळे भूविकास बँकेने तीन गावांतील शेतकºयांना नोटिसा लागू केल्या आहेत.विश्वास साखर कारखाना पुरस्कृत या पाणीपुरवठा योजना असल्या, तरी सध्या तरी या कर्जाची जबाबदारी कारखाना घेत नाही; ऊस मात्र विश्वास साखर कारखाना घेऊन जातो. सध्या शेतकरी अडचणीत सापडला आहे. पंधरा दिवसांपूर्वी बँकेने शेतकºयांच्या सात-बारावर कर्जाची नोंद करून जमीन विक्री करणार असल्याची नोटीस लागू केल्यामुळे तीन गावांतील शेतकरी भूमिहीन होणार आहे. शेतीवर उपजीविका असणाºया शेतकºयांवर उपासमारीची वेळ येणार आहे. तरी शासनाने तीन गावांतीत पाणीपुरवठा योजनांचे कर्ज माफ करून सात-बारा कोरा करण्याची मागणी होत आहे.
भूविकास बँकेच्या शेतकºयांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 11:47 PM