लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गणेशोत्सव काळात डॉल्बीबाबत केलेल्या प्रबोधनाकडे व सूचनांकडे डोळेझाक करुन ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाºया मंडळांवर थेट कारवाई करा, अशा कडक सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस अधिकाºयांच्या बैठकीत दिल्या.कसबा बावडा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पोलिस अधिकाºयांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर नांगरे-पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली.सातत्याने डॉल्बीबाबत पोलीस प्रशासनासह सामाजिक संस्थाही डॉल्बीच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करीत आहेत. मात्र याकडे डोळेझाक करणाºयांचे आता प्रबोधन नाही, त्यांच्यावर थेट कारवाई करा, असे नांगरे -पाटील यांनी सांगितले.संजय मोहिते म्हणाले, पुढील आठवड्यात गणेशोत्सव आहे. याच काळात ईद हा सण आला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखली पाहिजे. यंदाच्या गणेशोत्सवात आजरा, चंदगड व गडहिंग्लज हे तीन तालुके डॉल्बीमुक्त झाले आहेत. त्याचबरोबर हातकणंगले तालुक्यातील अनेक गणेश मंडळांनी डॉल्बीमुक्तीचा निर्धार केला आहे. कसबा बावडा येथे झालेल्या मंडळांच्या बैठकीत तीन गणेश तरुण मंडळांनी डॉल्बी लावणार नसल्याचे पत्र शाहूपुरी पोलिसांना दिले आहे; तर गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून जिल्ह्यात ३७० ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी जादा अधिकारी व कर्मचाºयांची मागणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये एक पोलीस उपअधीक्षक, पाच अधिकारी व ४३० कर्मचाºयांची मागणी तसेच १००० गृहरक्षक (होमगार्ड) मागविण्यात येणार आहे. पोलीस उपअधीक्षक यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकाºयांनी गावांना भेटी द्याव्यात, असे मोहिते यांनी सांगितले. बैठकीस जिल्ह्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते.११ फाळकूटदादा टोळ्या हद्दपारसमाजविघातक कृत्ये करून दहशत माजविणाºया ११ फाळकूटदादांच्या टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) नुसार हद्दपारीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. लवकरच त्यांना हद्दपार करणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.
आता प्रबोधन पुरे; थेट कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:51 AM