शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
2
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
3
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
4
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
6
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
7
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
8
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
10
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
11
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
12
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
13
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
14
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
15
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
17
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
18
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
19
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
20
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र

आता प्रत्येक घर ‘एलईडी’ बल्बने उजळणार

By admin | Published: January 22, 2016 1:03 AM

कोल्हापूर-सांगलीत मोहीम : साधे बल्ब इतिहासजमा होणार; फेब्रुवारीअखेर ४७ लाख बल्बचे उद्दिष्ट

विश्वास पाटील -- कोल्हापूर कोल्हापूर परिमंडळातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात घरगुती वीज ग्राहकांच्या घरी साध्या व ‘सीएफएल’ऐवजी ‘एलईडी’ बल्ब बसविण्याची मोहीम येत्या चार दिवसांत सुरू होत असल्याची माहिती ‘महावितरण’ कंपनीच्या अधिकृत सूत्रांनी दिली. कोल्हापूर व सांगलीत मिळून एकूण ११ लाख ८० हजार ७३२ घरगुती वीजग्राहक असून त्यांना फेब्रुवारीअखेरपर्यंत ४७ लाख २३ हजार इतक्या बल्बचे वाटप केले जाणार आहे.केंद्र शासनाच्या ‘एक्झिक्युटिव्ह इफिन्शिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेड’ (इइएसएल) या कंपनीकडून हे काम मुख्यत: होणार असून महावितरण कंपनीकडून त्यांना स्थानिक साहाय्य केले जाणार आहे.केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने वीजबचतीसाठी एलईडी बल्ब बसविण्याचा कार्यक्रम देशभर हाती घेतला आहे. ही पर्यावरणपूरक वीजबचत योजना आहे. त्यासाठी ग्राहकावर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही. एका ग्राहकास सरासरी चार बल्ब देण्यात येतील. या बल्बसाठी कंपनीकडून तीन वर्षांची गॅरंटी असेल. पहिल्या टप्प्यात नागपूर अर्बन, भांडुप आणि कल्याण; दुसऱ्या टप्प्यात नागपूर ग्रामीण, औरंगाबाद, अमरावती येथे ही मोहीम यशस्वीपणे राबविली आहे. आता तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूरसह पुणे, नाशिक, बारामती, कोकण, लातूर, नांदेड व जळगाव परिमंडळामध्ये ती सुरू होत आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत हे बल्ब बसविण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.बल्ब घेण्यासाठी ग्राहकांनी काय करायचे...चालू वीज बिलाची झेरॉक्स आणि पॅन कार्ड, वाहन परवाना असे कोणतेही छायाचित्र असलेले ओळखपत्र आवश्यक. विविध कंपन्यांच्या एलईडी बल्बची किंमत सरासरी ३०० रुपये आहे; परंतु केंद्र शासनाचे साहाय्य असल्याने हा बल्ब १०० रुपयांत दिला जाणार आहे. ज्यांना ही रक्कम एकदम भरून घेऊन बल्ब बसविणे शक्य नाही, त्यांना दरमहा दहा रुपये वीज बिलातून देता येतील.कसा असेल हा बल्ब..आता आपण वापरत असलेला साधा बल्ब हा सरासरी ४० ते ६० वॅट क्षमतेचा असतो. त्याची सरासरी किंमत २० रुपये आहे. सीएफएल बल्ब हा १४, १६ व २० व्हॅटचा असतो. त्याची किंमतही जास्त आहे. एलईडी बल्ब हा फक्त सात व्हॅटचा असेल; परंतु तरीही त्याचा प्रकाश हा साध्या ६० वॅटच्या बल्बइतका असेल.या बल्बचा प्रकाश साध्या बल्बपेक्षा अधिक पांढराशुभ्र असेल. तो तापणार नाही. शिवाय पर्यावरणपूरकही असेल.वीजवापर कमी, त्यामुळे बिलही कमी येईल.या बल्बसाठी कंपनीचीच तीन वर्षांची गॅरंटी असेल.बल्ब दुरुस्त करून देणे, बदलून देणे ही जबाबदारीही कंपनीचीच असेल.हे बल्ब महावितरणचे सर्व उपविभाग, शाखा कार्यालये, बिलिंग केंद्रांवर उपलब्ध असतील. बल्ब बसविण्याचे काम फेब्रुवारीअखेर संपविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे ते तातडीने सुरू करण्यात यावे यासाठी आम्ही ‘महावितरण’च्या मुख्यालयाशी संपर्कात आहोत. लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल. - शंकर शिंदेमुख्य अभियंता, महावितरण, कोल्हापूर परिमंडळ