कोल्हापूर : या महिनाअखेर मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा न केल्यास ५ सप्टेंबर रोजी मुंबईला धडक मारण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. हजारो चारचाकी वाहने आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत जाऊन तेथे कोंडी केल्याशिवाय सरकार जागे होणार नाही; म्हणूनच हा ‘गाडी मार्च’ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील विविध संघटना, कार्यकर्त्यांची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेमद्ये इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री विशेष अधिवेशन घेणार,असे सर्वत्र सांगत आहेत. त्यांनी ३१ आॅगस्टच्या आत ही तारीख जाहीर करावी. आमच्या मागण्यांबद्दल अधिवेशनामध्ये चर्चा व्हावी, मराठा समाजासाठीच्या योजनांसाठी आर्थिक तरतूद काय केली हे सांगावे. अन्यथा ४ सप्टेंबरला कोल्हापुरातील दसरा चौकातून मुंबईकडे ‘गाडी मार्च’ निघेल. मंत्रालयाला घेराव घालावा, स्टॉक एक्स्चेंजचे काम बंद पाडावे, अशा सूचना कार्यकर्त्यांनी केल्या आहेत.श्रीमंत शाहू महाराजांची गाडी पहिलीमुंबईकडे जाणाऱ्या मार्चमध्ये माझी गाडी सर्वांत पुढे असेल, असा शब्द श्रीमंत शाहू महाराजांनी आम्हांला दिल्याचे इंद्रजित सावंत यांनी सांगितले. याच पद्धतीने आता भाषणे करणाºया सर्वच नेत्यांनी आपल्या गाड्या मार्चच्या पुढे लावाव्यात, असे आवाहन करण्यात आले.
Maratha Reservation: हजारो कार्यकर्ते चारचाकी वाहनांसह मुंबईत धडकणार; मायानगरीची कोंडी करण्याची योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 2:25 AM