शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
4
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
5
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
6
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
7
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
8
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
9
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
10
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
11
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
12
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
13
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
14
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
16
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
17
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
18
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
19
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
20
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

अंगणवाड्यांना आता कच्चे धान्यवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 12:44 AM

नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अंगणवाड्यांतून लहान बालके, गरोदर, स्तनदा मातांना दिला जाणारा पोषण आहार बदलण्यात ...

नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अंगणवाड्यांतून लहान बालके, गरोदर, स्तनदा मातांना दिला जाणारा पोषण आहार बदलण्यात आला आहे. टीएचआर अर्थात तयार आहाराऐवजी कच्चे धान्य मिळू लागले आहे. त्यात गहू, मूगडाळ, चवळी, मटकी, मसूरडाळ, तेल, तिखट पूड, हळद, मीठ यांचा समावेश आहे. वयोगट व पोषण मानांकनानुसार त्याचे प्रमाण ठरविण्यात आले आहे.टीएचआरच्या ठेक्यावरून सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर राज्याच्या महिला व बालविकास विभागाने आहारासंदर्भात नवीन टेंडर प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने लाभार्थ्यांना टीएचआर वगळून अन्य आहार पुरवण्याच्या सूचना राज्य सरकारला केल्या होत्या. त्यानुसार महिला व बालकल्याण मंत्रालयाने जीआर काढून राज्यातील १८ विभागांत तयार आहाराऐवजी कच्चे धान्य वाटपाची तात्पुरती व्यवस्था सुरू केली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे.टीएचआरमध्ये सुजी, उप्पीट, शिरा, शेवया असे पदार्थ तयार करता येतील, असे पाकीट दिले जात होते. या पाकिटातील आट्यापासून वरीलप्रमाणे पदार्थ करून अंगणवाडीतील सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतची बालके, स्तनदा माता आणि गरोदर स्त्रियांना त्याचे वाटप केले जात होते. यात पोषणमूल्ये मिळावीत, ही अपेक्षा होती; तथापि या पदार्थांना चव नसल्याने अनेकजण तो स्वीकारत नसत. सक्ती केली जात असल्याने जनावरांना भुसा म्हणूनच त्याचा वापर केला जात होता. याविरोधात सातत्याने विरोध झाला. हा आहार बंद करावा, असा ठरावदेखील पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्ये झाला होता; पण हा राज्यस्तरीय ठेका असल्याने काही करता येत नसल्याची सबब सांगत ठेकेदाराला दरवर्षी कोट्यवधीची बिले दिली जात होती. यासंदर्भात थेट सर्वोच्च न्यायालयातच तक्रार गेल्यानंतर झालेल्या सुनावणीत आहाराविषयी चिंता व्यक्त करतानाच ठेकेदार सांभाळण्याच्या प्रवृत्तीवर गंभीर ताशेरे ओढले गेले होते. यानंतर हा आहार बदलण्याचा निर्णय घेतला.वाटपात तफावतकच्चे धान्य सेविका व मदतनिसांकडे पोहोच झाले आहे. प्रत्यक्षात वाटप करताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून थातूरमातूर उत्तरे दिली जातात. महिलांनी वाद घातल्यानंतर थोडेच धान्य दिले जात आहे. आलेले धान्य आणि वाटप यात तफावत दिसत आहे.दोन महिन्यांसाठीचे धान्यधान्य बालके गरोदर व स्तनदा मातागहू २८00 ते ३१00 ग्रॅम ३३00 ग्रॅम ते ४२५0 ग्रॅममसूरडाळ १५00 ते १३00 ग्रॅम १९00 ते १६५0 ग्रॅममिरची २00 ग्रॅम २00 ग्रॅमहळदी २00 ग्रॅम २00 ग्रॅममीठ ४00 ग्रॅम ४00 ग्रॅमसोयाबीन तेल ५00 ग्रॅम ५00 ग्रॅमचवळी १५00 ते १३00 ग्रॅम २000 ते १६५0 ग्रॅम