शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
4
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
5
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
6
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
7
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
8
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
9
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
10
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
11
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
12
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
13
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
14
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
15
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
16
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
17
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
18
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
19
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर

आता इंटरनेटवरही निकाल

By admin | Published: November 01, 2015 1:06 AM

महापालिका निवडणूक : मतमोजणीची तयारी पूर्ण; पाच ठिकाणी स्पीकरची व्यवस्था

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या, सोमवारी मतमोजणी होणार असून, त्याची तयारी प्रशासनाने शनिवारीच पूर्ण केली. सर्व ८१ प्रभागांची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये होणार आहे. मतमोजणीचा निकालही तत्काळ स्पीकरवरून व इंटरनेटच्या माध्यमातून जाहीर केला जाणार आहे. याकरिता सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. सात विभागीय निवडणूक कार्यालयांतर्गत सात ठिकाणी सरासरी ११ किंवा १२ प्रभागांची एकत्रित मोजणी केली जाणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी ३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, तर संपूर्ण मतमोजणीसाठी स्वतंत्र २६७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक निकाल ज्या-त्या विभागीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अखेरची सही झाल्यानंतर निवडणूक निरीक्षकांकडे सुपूर्द केला जाणार आहे. विद्यापीठ, कळंबा फिल्टरचा पहिला गुलाल शासकीय तंत्रनिकेतनमध्ये उद्या, सोमवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. लोकसभा व विधानसभेची मतमोजणी ही सकाळी आठ वाजता सुरू होते. कारण त्यांची मतमोजणी मतदानानंतर लगेच दुसऱ्या दिवशी नसते. एक दिवसाची मध्ये सुटी असते; परंतु महापालिकेसाठी आज, रविवारी मतदान आहे व लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी मतमोजणी होत आहे. त्यामुळे त्यांना मतमोजणीच्या कामासाठी पोहोचण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार असल्याचे महापालिकेच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. महापालिकेचे एकूण ८१ प्रभाग असले तरी प्रत्येक प्रभागात जितकी मतदान केंद्रे असतील, तितक्या मतमोजणीच्या फेऱ्या होतील. प्रत्येक प्रभागात सरासरी तीन ते सहा केंद्रे आहेत. शिवाजी विद्यापीठ-कृषी महाविद्यालय (प्रभाग क्रमांक ६४) आणि कळंबा फिल्टर हाऊस (प्रभाग क्रमांक ६८) या प्रभागांत प्रत्येकी तीन केंद्रे असल्याने या दोन प्रभागांचा निकाल सकाळी अकरा वाजताच जाहीर होईल. पहिला अर्धा तास टपालाची मतमोजणी होईल. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होईल. त्यामुळे दुपारी एक वाजेपर्यंत सगळा निकाल जाहीर होईल. प्रतिनिधींसाठी थांबे कोल्हापूर महापालिका निवडणूक मतमोजणीवेळी उद्या, सोमवारी खालील ठिकाणी विविध पक्षांच्या प्रतिनिधी, सदस्यांनी थांबावयाचे आहे. पक्ष/आघाडी व कंसात थांबण्याचे ठिकाण क्रमाने असे - ताराराणी आघाडी (कोयस्को चौक ), शिवसेना (सायबर कॉलेज चौक), राष्ट्रवादी काँग्रेस (प्री. आयएएस ट्रेनिंग स्कूल), काँग्रेस (हायवे कँटीन चौक), सर्व अपक्ष, बहुजन समाज पार्टी, शेकाप, मनसे, एस फोर ए व इतर (कृषी महाविद्यालय मैदान). मोबाईलवरही अ‍ॅप एखाद्या मतदाराला आपले मतदान केंद्र कोठे आहे हे पाहण्यासाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून मोबाईलसाठी अ‍ॅपही तयार केले आहे. नाव आणि क्षेत्र त्यात घातले की आपले मतदान केंद्र किती अंतरावर, कोठे आहे, याची माहिती मिळेल. उमेदवाराची संपत्ती, गुन्हे याची माहिती ‘पोलिंग बुथ व्होटर’ या अ‍ॅपद्वारे मिळणार आहे. निकाल ६६६.‘ेू येथेही पाहण्यास मिळणार आहेत.