कोल्हापूर : खासगी वाहतुकीसोबत स्पर्धा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने आधुनिक सुविधा देणारी शिवशाही बससेवा सुरू केली आहे. या गाडीची वाढती मागणी पाहता महामंडळाच्यावतीने ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ ही योजना आता ‘शिवशाही’ गाडीसाठीसुद्धा सुरू केली आहे. त्यामुळे कॅशलेस प्रवास आता शिवशाहीतून मिळणार आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ या योजनेअंतर्गत प्रवास करणारा प्रवासीवर्ग मोठा आहे. या प्रवाशांनाही ‘शिवशाही’ने प्रवास करता यावा, या उद्देशाने ‘आवडेल तिथे कोठेही प्रवास’ योजनेअंतर्गत शिवशाहीचा देखील पास प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या गाडीसाठी चार व सात दिवसांसाठी पास योजना असेल. तसेच गर्दीचा हंगाम आणि कमी गर्दीचा हंगाम असे दोन प्रकारचे पास दिले जातात. तसेच पासच्या मूल्याव्यतिरिक्त प्रतिपास पाच रुपये अपघात साहाय्यता निधीची आकारणी केली जाणार आहे. हे पासेस फक्त ‘शिवशाही’ आसनी बससेवेकरिता ग्राह्य राहतील.
‘शिवशाही’ शयन बससेवेतून या पासवर प्रवास करता येणार नाही. हा पास निम्म दर्जाच्या बससेवेसाठी (साधी, जलद, रात्रसेवा, शहरी, मिडीबस, निमआराम) वैध राहील. आंतरराज्य मार्गावरील पास महाराष्ट्र राज्यातसुद्धा वैध राहील.
असे आहेत दरगर्दीचा हंगाम : १५ आॅक्टोबर ते १४ जूनकमी गर्दीचा हंगाम : १५ जून ते १४ आॅक्टोबर
७ दिवसांच्या पासाचे मूल्यशिवशाही गर्दीचा हंगाम कमी गर्दीचा हंगाम
प्रौढ मुले प्रौढ मुलेशिवशाही आसनी १७८० ८९० १६४५ ८२५शिवशाही आंतरराज्य मार्ग १९२० ९६० १७८० ८९०
४ दिवसांच्या पासाचे मूल्यशिवशाही गर्दीचा हंगाम कमी गर्दीचा हंगाम प्रौढ मुले प्रौढ मुलेशिवशाही आसनी १०२० ५१० ९४० ४७०शिवशाही आंतरराज्य मार्ग ११०० ५५० १०२० ५१०