शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

वर्षारंभीच नृसिंहवाडी भाविकांनी फुल्ल; नववर्ष दिन व सुट्टी मुळे भाविकांचा दत्त दर्शनासाठी ओढा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2023 5:05 PM

कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेल्या व श्री दत्ताची राजधानी असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीचे महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा राज्याला आकर्षण असून वर्षारंभ रविवार सुट्टी च्या योगावर अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.

प्रशांत कोडणीकर  

कोल्हापूर- कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेल्या व श्री दत्ताची राजधानी असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीचे महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा राज्याला आकर्षण असून वर्षारंभ रविवार सुट्टी च्या योगावर अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. सांगली, मिरज, इचलकरंजी तसेच परिसरातून पहाटेच भाविक व महिलानी  थंडी असूनही चालत, दुचाकी गाडीने येवून दत्त दर्शन घेतले. सकाळी ११ वाजले पासून नृसिंहवाडी येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत गेली आणि असलेले पार्किंग फुल होऊन भाविकांनी येण्या – जाण्याच्या मार्गावर दुतर्फा गाड्या पार्क केल्या. येथील दत्त मंदिरात भाविकांना दर्शनासाठी ४ वेगवेगळ्या रांगा असूनही दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या. भाविकांनी वेदमूर्ती भैरंभट जेरे पुजारी प्रसादालय येथे महाप्रसादासाठी गर्दी केली.

येथील दत्त देव संस्थानचे वतीने मुखदर्शन, मुख्यदर्शन रांग, कापडी मंडप, सीसीटीव्ही कॅमेरा, ध्वनीक्षेपक यंत्रणा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षा रक्षक आदी व्यवस्था केली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी हजेरी लावली.

   भाविकांनी पूजा साहित्य, पेढे, मिठाई खरेदी बरोबरच बासुंदी पिण्यासाठी गर्दी केली. येथील सर्वच खानावळी गर्दीने फुलल्या होत्या.  दत्त मंदिरात पहाटे ५ वाजता काकडआरती, सकाळी 8 ते १२ यावेळेत पंचामृत अभिषेक, दुपारी १२.३० वाजता महापूजा, ३ ते ४ पवमान पंचसुक्त पठण, रात्रो 8 वाजता धूप, दीप आरती व पालखी सोहळा संपन्न होऊन १० वाजता शेजारती करणेत आली.

सेल्फी फोटो साठी ठिकठिकाणी गर्दी

 युवक युवतींसह अनेक भाविकांनी मंदिर व परिसर, नदीकाठ, आदी ठिकाणी फोटो व सेल्फी फोटो काढण्यासाठी गर्दी केली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर