नृसिंहवाडी : येथील स्वागत कमानी जवळ एस. टी. चालक, वाहक आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यात झालेल्या किरकोळ वादानंतर एस. टी. चालकाने रस्ता रोखून धरल्याने ऐन गुरुवार कुरुंदवाड व शिरोळ मार्गावर वाहतूकीचा बोजवारा उडाला. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन किलोमीटर अंतरावर गाड्या लागल्याने भाविकांना एस. टी. चालकामुळे भर उन्हात मनस्ताप सहन करावा लागला. काही तरूणांनी समजावून गाडी बसस्थानकात घेण्यास भाग पाडल्याने वाहतूक सुरळीत झाली.
नृसिंहवाडी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. त्यात बहुमजली पार्किंगचे काम सुरू असल्याने पार्किंग समस्या मोठी बनली आहे. असे असताना गर्दीच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वाहतुकीचे नियोजन लावताना मोठी तारांबळ उडते. असे असताना काही एस. टी. चालक हे भरधाव वेगाने गाडी मारत असतात. गर्दीच्या वेळी एकेरी वाहतूक केली असताना त्यातून न जाता एसटी चालकाने वाद घालत रस्त्यातच एस. टी. आडवी लावली. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. कुंरूदवाड व शिरोळ दोन्ही बाजूला दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अखेर काही तरूणांनी एस. टी. चालकाला गाडी बसस्थानकात घेण्यास भाग पाडले. मात्र, या भांडणात तासभर भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला. याबाबत कुंरूदवाड आगार आणि ग्रामपंचायतीने लक्ष घालून मार्ग काढावा, अशी मागणी भाविकांतून होत आहे.आगाराने लक्ष घालावेनृसिंहवाडी येथे असणाºया बसस्थानकात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील एस. टी. बसेस दररोज येत असतात. मात्र, ग्रामपंचायत कर्मचारीची वादावादी ही केवळ महाराष्ट्रातील एस. टी. बस चालकाबरोबरच वादावादी का होते. गर्दीच्यावेळी कर्नाटकातील चालक एकेरी वाहतूक सुरू असताना गाडी व्यवस्थित हाकतात. याबाबत कुरुंदवाड आगाराने लक्ष घालणे गरजेचे आहे.