कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाने केलेले लॉकडाऊन आणि बंद केलेली ई पास सुविधा यांमुळे गेल्या दोन दिवसांत कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण ६० टक्क्यांनी घटले आहे. आज, गुरुवारपासून हे प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखसाण्याठी सोमवार (दि. २०)पासून १०० टक्के लॉकडाऊन सुरू आहे. प्रशासनाने दोन आठवडे ई पास सुविधाही बंद केली आहे. त्यामुळे परगावच्या नागरिकांच्या कोल्हापुरात येण्यावर निर्बंध आले आहेत.
प्रशासनाने ई पास बंद करण्याआधीच ज्या नागरिकांना पास मंजूर झाले आहेत, ते लोक जिल्ह्यात येत आहेत. यापूर्वी ही संख्या दिवसाला दोन हजार इतकी होती. आता ती ८६७ वर आली आहे. मंगळवारी एक हजार नागरिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांत दाखल झाले आहेत. यापुढे हे प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता आहे.दिवसाला ३०० अर्जप्रशासनाने ई पास बंद केले असले तरी रोज जिल्ह्यातून तीनशेच्या आसपास अर्ज येतात. यांपैकी केवळ अत्यावश्यक कारणासाठीच परगावी जाण्यासाठीचे अर्ज मंजूर केले जात आहेत.