कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या कोरोनावर उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या २ हजार ५२५ वर आली आहे. गेल्या २४ तासांत नव्या २३४ रूग्णांची भर पडली असून, १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोल्हापुरात नवे ६० रूग्ण नोंदविण्यात आले आहेत. यात करवीर तालुक्यात ४५, हातकणंगले तालुक्यात १९ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांमध्ये हातकणंगले तालुक्यातील तिघांचा तर कोल्हापूर शहरातील दोघांचा समावेश आहे.
चौकट
तालुकावार मृतांची संख्या
हातकणंगले ०३
कबनूर, रांगोळी, पुलाची शिरोली
कोल्हापूर ०२
रामानंद नगर, साळाेखे पार्क
चंदगड ०१
तुरूकवाडी
कागल ०१
व्हनाळी
पन्हाळा ०१
निवडे
आजरा ०१
कोवाडे
इचलकरंजी ०१
करवीर ०१
गडमुडशिंगी
शिरोळ ०१
यड्राव