कोल्हापूर सलग आठवडाभर नव्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक येत असून हा एक प्रकारचा दिलासा मानला जातो. परंतु मृत्यूचे प्रमाण अजूनही आटोक्यात येत नाही हे वास्तव आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात नवे १४९९ रुग्ण आढळले असून १९५० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आठवड्याभरात १०४६६ कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले असून १४१५८ कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा ३६९२ ने जास्त आहे.
कोल्हापूर शहरामध्ये ४११ नवे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. करवीर तालुक्यात २४० तर हातकणंगले तालुक्यात १४५ नागरिकांना कोरोना झाला आहे. पन्हाळ्याची संख्या सलग दोन दिवस १०० वर आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत.
ज्या पध्दतीने करवीर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तसाच या तालुक्यातील मृतांचा आकडाही वाढताच राहिला आहे. शुक्रवारी करवीर तालुक्यातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर शहरातील आकडा कमी झाला असून तो केवळ पाच इतका आहे. मात्र इतर जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे.
चौकट
जिल्ह्यातील मृत्यू
करवीर ०७
मणेरमळा उचगाव २, तामगाव, कावणे, पाडळी खुर्द, कोगिल बु. आरे
कोल्हापूर शहर ०५
राजारामपुरी, प्रतिभानगर, कात्यायनी कॉम्प्लेक्स, बालाजी पार्क, बाबा जरग नगर
हातकणंगले ०३
खोची, अंबप, खोतवाडी
पन्हाळा ०३
आमटेवाडी, बहिरेवाडी, आवळी
इचलकरंजी ०३
नदीवेस, दातारमळा, जयकिसान चौक
राधानगरी ०३
तारळे खुर्द, मांगोली, चक्रेश्वरवाडी
शिरोळ ०२
कुरूंदवाड, हासूर
शाहूवाडी ०१
तुर्केवाडी
भुदरगड ०१
मुदाळ
आजरा ०१
लाकूडवाडी
कागल ०१
कागल
इतर ०७
निपाणी, मनगुत्ती, अळसंड, तडसर, आडी, केरूर, कालथरवाडी
चौकट
गेल्या सात दिवसातील आकडेवारी
दिनांक पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त
४ जून १६०५ १७२७
५ जून १४६१ २५६७
६ जून १५३० १९२४
७ जून १४४९ २०८७
८ जून १४५३ २१७५
९ जून १५१९ १७२८
१० जून १४४९ १९५०
एकूण १०४६६ १४१५८