शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
5
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
6
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
7
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
9
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
10
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
11
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
12
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
13
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
14
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
15
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
16
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
17
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
18
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
19
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
20
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल

ऊस गाळपात राज्यात ‘सोलापूर’च भारी, कोल्हापूर जिल्ह्यातील ‘जवाहर’ कारखाना अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 11:36 AM

हंगाम वेळेत सुरू झाला असला तरी परतीचा पाऊस आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर थोडा परिणाम झाला होता.

कोल्हापूर : साखर कारखान्यांचा हंगाम निम्यावर आला असून, गेल्या अडीच महिन्यांत राज्यात ५ कोटी ५६ लाख टन उसाचे गाळप होऊन ५ कोटी ४८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपामध्ये यंदा पहिल्यांदाच सोलापूर विभागाने आघाडी घेतली असून १ कोटी ३२ लाख ८३ हजार टनांचे गाळप केले आहे. कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर असून ‘जवाहर’ कारखाना राज्यात अव्वल ठरला आहे.

साखर कारखान्यांच्या यंदाच्या हंगामात ऊस दरावरून ताणाताणी झाली नाही. हंगाम वेळेत सुरू झाला असला तरी परतीचा पाऊस आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर थोडा परिणाम झाला होता. त्यातूनही कारखान्यांनी गाळप जोमाने सुरू ठेवले. यंदाच्या हंगामात राज्यात ९५ सहकारी, तर ९७ खासगी कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला आहे. त्यांनी ५ कोटी ५६ लाख उसाचे गाळप करून ५ कोटी ४८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

सर्वाधिक गाळप सोलापूर विभागात झाले आहे. त्यातही सोलापूर जिल्ह्यात तब्बल १ कोटी ५ लाख टन गाळप झाले असून, उस्मानाबाद जिल्ह्यात २७ लाख २५ हजार टन झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ८७ लाख ५२ हजार टन तर सांगली जिल्ह्यात ४५ लाख २५ हजार टन गाळप झाले आहे. साखर उताऱ्यात नेहमीप्रमाणे कोल्हापूर विभागच पुढे राहिला आहे.हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर साखर कारखान्याने राज्यात सर्वाधिक म्हणजे १० लाख ५६ हजार टन गाळप करत असताना ११.३५ टक्के उतार कायम राखला आहे. त्यापाठोपाठ माढा (जि. सोलापूर) येथील विठ्ठलराव शिंदे कारखान्याने १० लाख १७ टनांचे गाळप केले आहे.

विभागनिहाय गाळप टनात व उतारा टक्केवारी-

विभाग कारखाने गाळप उतारा
कोल्हापूर३५१.३२ कोटी ११.१६
पुणे२९१.१३ कोटी १०.०२
सोलापूर४५१.३२ कोटी ८.८९
अहमदनगर२६७४.९५ लाख ९.३२
औरंगाबाद२३४३.४६ लाख ९.२२
नांदेड२७५१.९७ लाख ९.७९
अमरावती३.९९ लाख ८.६०
नागपूर४ २.११ लाख ८.३९
टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेSolapurसोलापूर