कोल्हापूर - गेल्या तीन दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढली होती, ती कमी झाली असली तरी पुन्हा मृत्यूसंख्या वाढल्याचे चित्र बुधवारी संध्याकाळी स्पष्ट झाले. जिल्ह्यात नवे ११९९ रुग्ण नोंदविण्यात आले असून, ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासात मृतांचा आकडा ३५ वर आल्याने थोडा दिलासा मिळाला होता, तो बुधवारी फोल ठरला. परंतु रुग्णसंख्या काही प्रमाणात घटली आहे. कोल्हापूर शहरामध्ये सर्वाधिक २७० तर त्याखालोखाल हातकणंगले तालुक्यात १९२ नवे रुग्ण आढळले आहेत. गडहिंग्लज तालुक्यात ११७ तर करवीर तालुक्यात ११६ नवे रुग्ण नोंदले गेले आहेत. इचलकरंजी शहरामध्ये ८५ आणि इतर जिल्ह्यातील १०२ नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
चौकट
हातकणंगले तालुक्यात ९ मृत्यू
हातकणंगले ०९
हेर्ले २, वडगाव २, तारदाळ, कबनूर २, यळगूड, कुलकर्णी मळा
कोल्हापूर ०८
कदमवाडी, नागाळा पार्क, शिवाजी पेठ, अंबाई टँक, चंबुखडी, जवाहरनगर, शिवाजी चौक, साने गुरुजी
गडहिंग्लज ०६
खणदाळ, माद्याळ, हलकर्णी २, गडहिंग्लज, भडगाव
करवीर ०५
देवाळे, पाडळी खुर्द, दऱ्याचे वडगाव, म्हारुळ, कणेरीवाडी
शिरोळ ०५
कुरुंदवाड, शिरढोण, यड्राव फाटा खोतवाडी, उदगाव, चिंचवाड
आजरा ०४
बहिरेवाडी, शिवाजीनगर आजरा, भादवण, हालेवाडी
कागल ०२
गलगले, आझाद चौक कागल
इचलकरंजी ०२
इचलकरंजी, सांगली फाटा
पन्हाळा ०२
कोडोली, मोहरे
चंदगड ०१
कोरज नागनवाडी
इतर ०५
येलूर बेळगाव, पलूस, मिणचे देवगड, धाेनेवाडी निपाणी, वागोंडी कणकवली.