कोल्हापूर : कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नर्सिंगच्या दूसरे वर्षात शिक्षण घेणाºया विद्यार्थींनीने वसतीगृहाच्या तिसºया मजल्यावरील रुमध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. शेफाली उर्फ पुजा राजु पवार (वय १९, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) असे मृताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या प्रकारामुळे महाविद्यालयीन प्रशासनात खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी सांगितले, शेफाली पवार ही गेल्या दोन वर्षापासून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नर्सिंगच्या दूसरे वर्षात शिकते. महाविद्यालयाच्या इमारतीच्या तिसºया मजल्यावरील वसतीगृहात ती राहत होती. गुरुवारी जेवण करुन ती रुममध्ये झोपली. तिची रुमपार्टनर श्रध्दा गाडे हि सकाळी साडेसहाच्या सुमारास उठली तर ती बेडवर नव्हती. गाडे व तिची मैत्रीण अंघोळी करुन हजेरीसाठी गेल्या. याठिकाणी शेफाली दिसत नसल्याने तिला बोलविण्यासाठी त्या पुन्हा वरती आल्या. रुममध्ये ती आलीच नव्हती.
अंघोळ करुन कपडे वाळत घालत असेल म्हणून शेजारील रिकाम्या खोलीचा बंद दरवाजा त्यांनी ढकलून उघडला असता येथील सिलींग फॅनला काळ्या ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून त्या खाली धावत आल्या येथील प्राध्यापकांना व वसतीगृह अधिक्षकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर सगळेच वरती पळत आले. त्यांनी कात्रीने ओढणी तोडून सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वी तिचा मृत्यू झालेचे डॉक्टरांनी सांगितले. शेफालीने गळफास घेण्यासाठी लाकडी खुर्चीची मदत घेतली होती. ती त्याठिकाणीच होती. वसतीगृहातील इतर विद्यार्थींनी याप्रकारामुळे बिथरल्या आहेत.
या घटनेची माहिती समजताच लक्ष्मीपूरीचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर, उपनिरीक्षक एस. बी. शेळके घटनास्थळी आले. त्यांनी रुमचा पंचनामा करुन शेफाली ज्या रुममध्ये राहत होती. तेथील कपडे, तिची पुस्तके, वह्या, बँगची पाहणी केली. चिठ्ठी लिहून ठेवली आहे काय, त्याचा शोध घेतला. तिचा मोबाईल रुममधील टेबलवरतीच होता. तो पोलीसांनी जप्त केला. त्याच्यावरील कॉलची माहिती पोलीस घेत आहेत. मैत्रीण श्रध्दा गाडेसह अन्य परिचारीकांचे जबाब पोलीसांनी घेतले.
घरची परिस्थिती बेताची
नऊ वर्षापूर्वी वडीलांचे छत्र हरवलेल्या शेफालीवर घरची जबाबदारी होती. आई, दोन लहान भाऊ असा तिचा परिवार. घरची परिस्थिती बेताची असल्याने आत्तेभाऊ त्यांचे घर सांभाळत होता. मुलीच्या आत्महत्यचे वृत्त समजताच आईने हंबरडा फोडला. लहान भाऊ शुभम व आयुष्य कावरेबावरे झाली होती. शेफालीने बारावीनंतर नर्सिंगला प्रवेश घेतला होता. तिची परिचारीका होवून रुग्णांची सेवा करण्याची जिद्द होती. स्वप्नपूर्ती होण्यापूर्वी तिने आत्महत्या का केली, हे पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे.