शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

पोषण आहाराला धान्यच मिळेना...

By admin | Published: January 08, 2016 12:35 AM

दरवाढीचा फटका : शाळांचा पोषण आहार बंद

प्रकाश पाटील--कोपार्डे -योजना तशी चांगली, पण वेशीला टांगली हा अनुभव सध्या शालेय पोषण आहाराच्या बाबत पहायला मिळत आहे. शाळांना शालेय पोषण आहारासाठी देण्यात येणारे धान्य उपलब्ध न झाल्याने हा आहार शिजवण्याचा ठेका घेणाऱ्या महिला बचत गटांना पदरमोड करण्याची वेळ आली. मात्र, हे ओझे पेलवेनासे झाल्याने बचत गटांनीही आता मान टाकली आहे.जिल्हा परिषदांच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घट हा चिंतनाचा विषय आहे. त्याचबरोबर देशातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शाळेचा ओढा वाढावा याचबरोबर कुपोषित मुलांचे प्रमाण कमी व्हावे, हा उद्देश ठेवून राज्यशासनाद्वारे शालेय पोषण आहार ही योजना अंमलात आणली. यासाठी शासनाने कडक नियमावली तयार केली. मुलांना ठरलेल्या प्रमाणात व वेळेवर तो मिळालाच पाहिजे, अन्यथा यासाठी मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात आले. मुख्याध्यापकांनीही याबाबत थोडी नाकुशीने का असेना पण आदेशाचे पालन करण्यासाठी आहार शिजविण्याचा ठेका देण्यात आलेल्या महिला बचत गटाकडून तो योग्य प्रमाणात व वेळेत मिळावा यासाठी प्रयत्न केले. ही पोषण आहार योजना चांगली सुरू होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून धान्य पुरवठ्यांची अनियमितता सुरू आहे. उशिरा का असेना, पण धान्य मिळते व रोजगाराचे साधन बंद होऊ नये म्हणून बचतगट स्वत:च्या खर्चातून धान्य उपलब्ध करून देत होते. मात्र, गेली दोन महिने तो मिळालाच नसल्याने बचत गटांनीही तो देणे बंद केला आहे. धान्य पुरवण्याच्या ठेक्याची मुदत संपलीशालेय पोषण आहार पुरवण्यासाठी ज्या मार्केटिंग फेडरेशनला ठेका दिला होता त्याची मुदत डिसेंबर २०१५ ला संपली आहे. मात्र, शासनाने या ठेक्याची मुदत संपण्यापूर्वीच नवीन करार अथवा ठेकेदार नेमणे गरजेचे होते, परंतु त्यासाठी विलंब झाला. त्यामुळे धान्य मिळाले नसल्याचे सांगण्यात येते. वेळेत धान्य मागणी न केल्यास कारवाईशालेय पोषण आहाराबाबत शासनाने कडक नियमावली तयार केली आहे. धान्याची मागणी वेळेत करणे व योग्य प्रकारे पोषण आहार मुलांना मिळावा याची मुख्याध्यापकांवर जबाबदारी आहे. २० नोव्हेंबर २०१५ पूर्वीच मुख्याध्यापकांनी लागणाऱ्या पोषण आहाराची मागणी केल्याची माहिती आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एक मुख्याध्यापकाने सांगितले. तरीही तो मिळाला नाही. मग आता कारवाई कोणावर, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. दरवाढीचाही फटकापोषण आहारात तूरडाळीचा समावेश आहे. मात्र, सध्या तूरडाळ १८० ते २०० रुपयांवर पोहोचली आहे, तर शासन यासाठी ८७ रुपये प्रतिकिलो देते. मग तोट्यात धंदा कोण करणार असे म्हणत ठेकेदार वाटाणा व चवळी आमटीसाठी पुरवतात. मात्र, ही आमटी खाण्यायोग्य नसते. त्यामुळे मुले हे खात नाहीत.स्नेहभोजन योजनेबाबतही उदासीनतामुलांना सुग्रास जेवणाचा लाभ व्हावा म्हणून शासनाने स्नेहभोजनाची संकल्पना आणली. गावातील संस्था, राजकीय व्यक्ती यांच्या वाढदिवस कार्यक्रमानिमित्त भोजन व्यवस्था असेल तर त्या गावातील शाळेतील मुलांना हे जेवण मिळावे म्हणून शिक्षण समिती, मुख्याध्यापक व ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न व्हावेत. या निमित्ताने मुलांना सुग्रास जेवणाचा लाभ मिळेल, पण याबाबतही शाळा पातळीवर उदासीनता दिसते.