शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
2
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
3
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
4
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
5
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
6
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
7
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
8
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
10
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
11
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
12
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
13
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
15
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
16
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
17
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
18
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
19
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
20
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

पोषण आहारात आता ‘स्नेहभोजन’

By admin | Published: August 18, 2015 10:13 PM

शिक्षण विभागाचा उपक्रम : लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न

प्रकाश पाटील- कोपार्डे  -शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी व कुपोषण मुक्तता करण्यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली आहे. या योजनेत लोकसहभाग वाढवून ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ‘स्नेहभोजन’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम सुरू होणार आहे. शालेय पोषण आहार योजनेत समाजाचा सहभाग वाढविण्याच्या हेतूने विशेष दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना चांगला आहार देण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. आहारातील पौष्टिकता वाढविण्यास मदत होईल, विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण अन्नपदार्थांची चव चाखता यावी तसेच सामाजिक बंधुता, एकतेची भावना, सामाजिक बांधीलकी वाढण्यास मदत होईल. या अनुषंगाने लोकसहभागातून ‘स्नेहभोजन’ उपक्रम राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र, हा उपक्रम ऐच्छिक स्वरूपाचा राहणार आहे. यात मान्यवर व्यक्तींचे वाढदिवस, सुवर्णमहोत्सव, अमृतमहोत्सव, जन्मशताब्दी, लग्नसमारंभ, धार्मिक सप्ताह, राष्ट्रीय सण, स्थानिक पातळीवरील सण आदी बाबी या उपक्रमांतर्गत विशेष दिनाच्या औचित्यामध्ये समाविष्ट राहतील. स्नेहभोजनाचे आयोजन शाळेने करावयाचे आहे. त्यासाठी शाळेने वर्षभराचे नियोजन करावयाचे आहे. यामध्ये आवश्यक बदल करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस आहेत. त्यासाठी ग्रामसभा, शालेय व्यवस्थापन समितीची सभा, पालक सभेद्वारे जनजागृती करण्याचे काम करताना ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांना प्रक्रियेत सहभागी करून घ्यावयाचे आहे. ‘स्नेहभोजन’ उपक्रमांतर्गत कोणत्या तारखेस भोजन होणार व कोणत्या पदार्थाचा समावेश करणार याबाबत शाळा व्यवस्थापन समिती व वितरकाने एकत्रित निर्णय घ्यायचा आहे. शाळेच्या कामकाजावर परिणाम नाहीस्नेहभोजन उपक्रमांतर्गत शाळांना रोख रक्कम न देता खाद्यपदार्थ किंवा इतर आवश्यक पदार्थ उदा. पाण्याचे पिंप, ग्लास, ताटे, चमचे, चटई, पाणी शुद्धिकरण यंत्रही देता येईल. खाद्यपदार्थ हे ताजे व पौष्टिक असावेत, तसेच ते मुलांना शाळेतच तेही भोजनाच्या वेळेतच देण्याची अट आहे. भोजनातून अनुचित प्रकार घडू नये याची जबाबदारी वितरकाची राहणार आहे. स्नेहभोजनाने शाळेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही याची काळजीही घेणे शाळांना बंधनकारक आहे.