कोल्हापूर : केंद्र शासनाच्या गलथान कारभारामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले याचा निषेध करीत हे आरक्षण मिळावे यासाठी कोल्हापूर शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे केंद्र सरकारविरोधात स्टेशन रोड येथे काँग्रेस कमिटीसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी ‘आरक्षण आमच्या हक्काचे - नाही कुणाच्या बापाचे,’ ‘ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे,’ ‘सर्वोच्च न्यायालयाला आकडेवारी न देणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो,’ अशा घोषणा देण्यात आल्या.
सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसींची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. मात्र केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही; त्यामुळे ओबीसीचे आरक्षण न्यायालयाने रद्द केले. याला सर्वस्वी तत्कालीन देवेंद्र फडणवीस व केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे शहर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्यायदिनी जन आंदोलन करण्यात आले.
यावेळी सरलाताई पाटील, संध्या घोटणे, सचिन चव्हाण, संजय पवार वाईकर, तौफिक मुल्लाणी, संपतराव पाटील, मोहम्मद शेख, किशोर खानविलकर, प्रदीप चव्हाण, शंकरराव पाटील, बाळासाहेब सरनाईक, दीपक थोरात, अक्षय शेळके, उमेश पोरलेकर, आकाश शेलार, रणजित पवार, सुलोचना नाईकवाडे, सुरेश कुराडे, रंगराव देवणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
--
फोटो नं २६०६२०२१-कोल-काँग्रेस कमिटी
ओळ : कोल्हापूर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी स्टेशन रोड येथे ओबीसी आरक्षण रद्दच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
--