कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक व शासकीय जागांवरील ३१० अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर याबाबत महापालिकेने गुुरुवारी हरकती मागविल्या. त्यामध्ये चार विभागीय कार्यालयांमध्ये एकूण ३५ हरकती व सूचना दाखल झाल्याउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्याचा कालबद्ध कृती कार्यक्रम तयार केला आहे. त्यानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित करणे, स्थलांतरित करणे किंवा ही बांधकामे काढून टाकण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी वर्गवारी करण्यात आली आहे. ‘अ’ अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित करणे वर्गवारीत १८० धार्मिक स्थळांचा समावेश आहे. तर ‘ब’ अनधिकृत धार्मिक स्थळांची बांधकामे काढणे वर्गवारीत १३० धार्मिक स्थळांचा समावेश आहे. या यादीमध्ये शहरातील प्रमुख मंदिरे, मस्जिद, चर्च यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याबाबत महापालिकेच्यावतीने चार विभागीय कार्यालयांतर्गत त्या त्या विभागाच्या क्षेत्रातील हरकती व सूचना स्वीकारण्याचे काम गुरुवारी दिवसभर सुरू होते. त्यात राजारामपुरी विभागीय कार्यालयांतर्गत एकूण आठ हरकती दाखल झाल्या. यामध्ये शाहूपुरी, सरनाईक वसाहत, विक्रमनगर, आदींचा समावेश आहे. तर ताराराणी चौक विभागीय कार्यालयांतर्गत त्र्यंबोलीनगर (लाईनबझार), बापट कॅम्प, हिंद को-आॅप. सोसायटी, कदमवाडी, आदी भागातील चार हरकती, तर शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयांतर्गत व्हीनस कॉर्नर, फुलेवाडी, शनिवार पेठ येथील तीन धार्मिक स्थळांचा समावेश आहे. गांधी मैदान विभागीय कार्यालयांतर्गत सर्वांत जास्त म्हणजेच २० हरकती दाखल झाल्या आहेत. यामध्ये शिवाजी पेठ व उपनगरातील धार्मिक स्थळांचा समावेश आहे. चारही विभागीय कार्यालयांतर्गत गुरुवारी एकूण ३५ हरकती दाखल झाल्या आहेत. याकरिता महापालिकेने ईद-ए-मिलादची सुटी असूनही चारही विभागीय कार्यालये हरकती स्वीकारण्यासाठी उघडी होती.
दिवसभरात ३५ धार्मिक स्थळांबाबत हरकती-सूचना
By admin | Published: December 25, 2015 12:16 AM