शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
2
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
3
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गंमतीदार किस्सा
5
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
6
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
7
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
8
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
9
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
10
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
11
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
12
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
13
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
14
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
15
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
17
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
18
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
19
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
20
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

कोल्हापुरात कॅफेत सुरू होते अश्लील चाळे, निर्भया पथकाची कारवाई; पालकांना बोलावून दिली समज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 12:11 PM

पाच मुले, चार मुली आढळल्या, पालकांना बोलावून दिली समज

कोल्हापूर : निर्भया पथकाने शुक्रवारी मोठ्या फौजफाट्यासह अंधाऱ्या खोलीत अश्लील चाळे करणाऱ्यांवर थेट कारवाईस सुरुवात केली. यात शहरातील उमा टाॅकीज परिसरातील कॅफेत चार मुली आणि पाच मुले आढळून आली. त्यांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले असून, कॅफे चालकावरही कारवाई करण्यात आली.पाच दिवसांपूर्वी खासबाग परिसरातील बस स्टाॅपजवळ उभ्या असलेल्या विद्यार्थिंनीची छेडछाड काढणाऱ्या तरुणांना नागरिकांनी चोप दिला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. याची अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी गांभीर्याने नोंद घेतली. असे प्रकार घडल्यानंतर थेट पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.दरम्यान, शहरातील कॅफेंचीही निर्भया पथकाने तपासणी केली. यात उमा टाॅकीज परिसरातील एका कॅफेची तपासणी केली असता त्यात चार मुली, पाच मुलांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले. या सर्वांना जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या सर्वांच्या पालकांना बोलावून घेऊन त्यांच्यासमोर कडक समज देण्यात आली. तर कॅफे चालकाचा परवाना रद्द करण्यासाठी महापालिकेकडे पत्र पाठविण्यात आले आहे.शाळा, महाविद्यालयांना सूचनाशाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसाठी तक्रारपेट्या असाव्यात, तक्रारींची वेळीच दखल घ्यावी, ओळखपत्राशिवाय इतरांना कॉलेजच्या आवारात प्रवेश देऊ नये, हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना वेळीच समज द्यावी, विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत, छेडछाडीबद्दल विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्यास त्यांच्या पालकांना बोलावून समज द्यावी, काही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, अशा सूचना पोलिसांनी शाळा, महाविद्यालयांना दिल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस