या सभेत महापूर आणि उपाययोजनांबाबतही चर्चा झाली. विजय भोजे म्हणाले, महापुरामुळे शिरोळ तालुक्याचे वाटोळे झाले आहे. शेतकऱ्यांना एक लाखाचे अनुदान द्या. सतीश पाटील म्हणाले, नद्यांमध्ये साठलेला गाळ आणि अतिक्रमणे काढण्याची गरज आहे. पाझर तलावातील गाळ काढून नेण्याची योजना जाहीर करा. युवराज पाटील म्हणाले, नदीकाठच्या पाणी योजना वरच्या बाजूला घेण्याची गरज आहे. साखर कारखान्यांनी भाग विकास निधीतून यंत्रणा द्यावी आणि शेतकऱ्यांनी गाळ न्यावा अशी सूचना केली.
यावेळी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते डॉ .संदीप पाटील - आंबा, जयप्रकाश लोले - हुपरी, गोपाळ पाटील - बोरपाडळे, रोहित दाभाडे - कागल, दीपाली बोटे - शिरोळ, हेमंत इंगवले - गडहिंग्लज, स्वप्निल भोपळे - भुदरगड, गीता हुजरे आशा स्वयंसेविका यांचा कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.
चौकट
यांची झाली समितीवर निवड
बजरंग पाटील, सतीश पाटील - स्थायी समिती
हंबीरराव पाटील, सोनाली पाटील - आरोग्य समिती
स्वाती सासने - समाजकल्याण समिती
पद्माराणी पाटील - शिक्षण व महिला बालकल्याण समिती
प्रवीण यादव - अर्थ समिती
अरुण सुतार - शिक्षण समिती
मंगल पाटील - कृषी समिती
रमेश तोडकर, वैशाली पाटील - पशुसंवर्धन व दुग्ध समिती
आक्काताई नलवडे - महिला व बालकल्याण समिती
दीपाली संजय परीट - अर्थ समिती
शिल्पा चेतन पाटील - बांधकाम समिती
चौकट
यांनी केल्या मागण्या
बजरंग पाटील - गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टीने रस्त्यांचे मोठे नुकसान, जादा निधी द्यावा.
हंबीरराव पाटील - शाहू पुरस्काराचे आरोग्य विभागाचे कर्मचारी जाहीर का केले नाहीत?
स्वरूपाराणी जाधव - कडगाव, पाटगाव आरोग्य केंद्राला मनुष्यबळ द्या.
स्वाती सासने - २६०० कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना ११ महिन्यांचा पगार द्या.
रेश्मा देसाई - कोरोना काळात गारगोटी ग्रामपंचायतीने चांगले काम केले तरी अतिरिक्त मनुष्यबळाचा आक्षेप कसा घेता?
विजय बोरगे - शिंगणापूर प्रशालेतील कबड्डी मॅटची चौकशी करा.
मनीषा माने - पूरग्रस्तांचे पुनर्वसन करताना जुने घर सोडण्याची अट रद्द करा.
प्रसाद खोबरे - यापुढे भरावाचे पूल नको, कॉलमवरील पूल करा.
अंबरीश घाटगे - पुरामुळे विहिरी बुजल्या आहेत, जिल्हा परिषदेने मदत करावी.
अनिता चौगुले - महिला बाल कल्याणच्या योजनांच्या अटी कमी करा.