शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

अधिकाऱ्यांचा नखरा, कार्यकर्त्यांच्या चकरा

By admin | Published: October 21, 2015 12:33 AM

खर्चाचे विवरणपत्र : निवडणूक कार्यालयांचा सावळा गोंधळ; कार्यकर्ते हेलपाटे मारून वैतागले

राजाराम लोंढे - कोल्हापूर -महापालिका निवडणूक अंतिम टप्प्यात आली तरी राजकीय पक्षांना विहीत नमुन्यात सादर करावी लागणारी खर्चाची विवरणपत्रे अद्याप मिळालेली नाहीत. खर्चाचा तपशील वेळेत दिला नाही तर निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी राजकीय पक्षांवर कारवाई केली जाते. निवडणूक कार्यालयांच्या सावळ्या गोंधळापुढे राजकीय पक्ष हतबल झाले असून, विवरणपत्रांसाठी कार्यालयात हेलपाटे मारून कार्यकर्ते थकले आहेत. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांबरोबर आघाड्याही रिंगणात ताकदीने उतरल्याने प्रचाराने चांगलाच रंग घेतला आहे. प्रचाराचा प्रारंभ व जाहीरनाम्याचे प्रकाशन समारंभात राजकीय पक्षांनी एकमेकांवर थेट हल्ला सुरू केला आहे. व्यक्तिगत पातळीवर टीका-टिप्पणी करत रोज एकमेकांचे वाभाडे काढण्याची संधी सोडली जात नाही. राजकीय पक्षाचे प्रमुख नेते मंडळी, उमेदवार प्रचारात गुंग झाले असले तरी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय पक्षांना निवडणूक कार्यालयाकडे खर्च सादर करावा लागतो. पक्षाच्या उमेदवारांचा व्यक्तिगत खर्चाची माहिती स्वतंत्र द्यावी लागतेच, पण त्याबरोबर पक्षांकडून केला जाणाऱ्या खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाला सादर करावा लागतो. सभा, प्रचारफेऱ्या, जाहीरनामा व जाहीरनामा प्रसिद्धी समारंभ, डिजिटल फलक आदींचा खर्च पक्षांना द्यावा लागतो. उमेदवारांप्रमाणे दररोजचा खर्च पक्षांना द्यावा लागत नाही; पण पंधरा दिवसांतून एकवेळ संपूर्ण खर्च विहीत नमुन्यात निवडणूक कार्यालयाकडे सादर करावा लागतो. विहीत नमुन्यात खर्च सादर करण्यासाठी १८ आॅक्टोबरपर्यंत मुदत होती. विहीत नमुन्यातील अर्जच निवडणूक कार्यालयाकडून उपलब्ध होऊ न शकल्याने खर्चाचा तपशील सादर करता आलेला नाही. विवरण पत्रे मिळावीत यासाठी पक्ष कार्यालयातील कार्यकर्ते हेलपाटे मारत आहेत; पण त्यांची दखलच कोणी घेत नाही. निवडणूक खर्चाबाबत आयोजित केलेल्या बैठकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत तक्रार केली होती तरीही निवडणूक कार्यालयाने त्याची दखल घेतलेली नाही. विहीत नमुन्यात व वेळेत खर्च जमा केला नाही तर आचारसंहिता भंगाबद्दल कारवाई होऊ शकते. त्यामुळे एका राजकीय पक्षाने याबाबत निवडणूक शाखेकडून सहकार्य मिळत नसल्याचे लेखी म्हणणे सादर करून निवडणूक विभागालाच कायद्याच्या कचाट्यात बांधून घेतले आहे. दरम्यान, याबाबत महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी पी. शिवशंकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असतो, तो होऊ शकला नाही. नोटिसीची तंबी राजकीय पक्षांच्या कार्यालयाकडून विहीत नमुन्यातील अर्जाबाबत पाठपुरावा सुरूच आहे; पण वेळेत खर्च दाखल न केल्याने निवडणूक कार्यालयाकडून संबंधितांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे समजते.