ग्रामसेवक अकिवाटे एक वर्षापूर्वी गावात हजर झाले आहेत. सरपंच हैदरखान मोकाशी थेट जनतेतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. ग्रामसेवक अकिवाटे सरपंचांना घेऊन मनमानी कारभार करीत आहेत. गावच्या विकासकामाबाबत सदस्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार सदस्यांची आहे. चौदाव्या वित्त आयोगातील निधीचा बेकायदेशीर वापर केला असल्याने याबाबत तक्रारही झाली आहे. त्यातच महापुरात घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबांना सिनेअभिनेता सलमान खान यांच्या एलान फौंडेशनच्या माध्यमातून गावात ६९ घरे बांधण्यात येत आहेत. या घरांच्या वाटपातही आर्थिक तडजोडी होत असल्याच्या ग्रामसेवकाविरुद्ध तक्रारी आहेत.
ग्रामसेवक अकिवाटे यांची बदली करावी यासाठी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी लेखी तक्रार केली आहे. याची दखल घेतली गेली नसल्याने उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र, उपोषणाचा दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत निर्णय घेणारे सक्षम अधिकारी न आल्याने आंदोलकांबरोबर ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.