राजाराम कांबळे - मलकापूर- शाहूवाडी तालुक्यातील माण प्राथमिक शाळेचे शिक्षक लक्ष्मण कुंडलिक वाठोरे यांनी माहिती तंत्रज्ञानातील ज्ञान आत्मसात करून शिक्षण प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी विविध सॉफ्टवेअर तयार केले आहेत. दप्तराचे ओझे कमी करणारी आॅफलाईन अॅप्स टेक्नॉलॉजी महाराष्ट्रात प्रथमच निर्माण केली आहे. त्याचा फायदा दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी होईल. जिद्द, परिश्रम व चिकाटीच्या जोरावर लक्ष्मण वाठोरे यांनी शिक्षण प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी २०११ ते १२ मध्ये ‘आदर्श शाळा’ या ब्लॉग साईटची निर्मिती केली. विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी हा उपक्रम उपयोगी आहे. त्यांनी तयार केलेले आॅफलाईन आदर्श इंग्रजी अॅप्लिकेशन हा मराठी शाळेसाठी महाराष्ट्रातील पहिला आॅफलाईन प्रयोग आहे.विद्यार्थ्यांना मराठीतून इंग्रजी बोलण्यासाठी ज्ञान प्राप्त होणार आहे. इयत्ता चौथी विद्यार्थ्यांना प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील दुसरा अनुप्रयोग निर्माण केला आहे. शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी अध्ययन-अध्यापन प्रभावी व परिणामकारक होण्यासाठी ई-बुक लायब्ररी या मातृभाषेतील विकासासाठी प्रथम भाषा पद्धती, मानसशास्त्रातील शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययन पद्धती व विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता, मूल्यमापन पद्धती, कार्यानुभव विषयाचे अध्ययन, आरोग्य विषयक शालेय आरोग्य शिक्षण पद्धतीचा विकास करण्यात आला आहे. या सर्व बाबी गुगल सर्चमध्ये ‘आदर्श शाळा’ या सर्चद्वारे पाहायला मिळणार आहेत. तसेच डाऊनलोडिंगसाठी पहिली ते आठवी सर्व माध्यमातील पी.डी.एफ. पुस्तके व महाराष्ट्र शासनाच्या सर्व वेबसाईट, स्पर्धा परीक्षा व इतर सर्व ई-बुक्स सामान्य ज्ञानाचे संकलन केले आहे. या साईडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे. (प्रतिनिधी)शैक्षणिक गुणवत्ता विकासातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवता येईल. यासाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींचे सुप्त गुण सॉफ्टवेअर निर्मितीतून माहिती तंत्रज्ञान आधारे एकत्र समालोचन करण्यासाठी संगणकीय ज्ञानाचा उपयोग करता येईल.-लक्ष्मण वाठोरे, प्राथमिक शिक्षक.
आॅफलाईन अॅप्सने दप्तराचा भार हलका
By admin | Published: March 17, 2015 10:46 PM