शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
2
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
3
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
4
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
5
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
6
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
7
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
8
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
9
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
10
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
11
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
12
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
13
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
14
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
15
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
16
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
17
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
18
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
19
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
20
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी

रिक्षांसह वाहनचालकांचा मंगळवारी बंद

By admin | Published: March 04, 2016 11:20 PM

परमिट शुल्कवाढीचा प्रश्न : ‘आरटीओ’ कार्यालयाजवळ निदर्शने; सोमवारी मध्यरात्रीपासून सुरुवात

कोल्हापूर : नवीन परमिट व नूतनीकरणाचे वाढविलेले शुल्क रद्द करावे, या मागणीसाठी मंगळवारी (दि. ८) रिक्षासह लक्झरी, स्कूल बस, ट्रक, टॅक्सीचालकांनी बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रश्नी शुक्रवारी दुपारी ताराबाई पार्कमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ (आरटीओ) चालकांनी तीव्र निदर्शने केली. या मागणीसाठी रिक्षाचालकांनी राज्यात सर्व जिल्ह्यांतील आरटीओ कार्यालयांसमोर आंदोलन केले.शासनाने १० फेबु्रवारी २०१६ रोजी माल व प्रवासी वाहनधारकांवर नवीन व नूतनीकरण परमिटचे शुल्क वाढविण्याची अधिसूचना काढली आहे. त्यास रिक्षाचालक, ट्रकचालक, लक्झरी, स्कूल बस, ट्रक यांचा विरोध आहे. देशात महाराष्ट्र हे महसुलाबाबत सधन राज्य म्हणून ओळखले जाते. वर्षाकाठी माल व प्रवासी वाहनधारक वाहनांच्या सर्व करांच्या माध्यमातून पाच हजार कोटी रुपयांचा कर महसूल म्हणून शासनाच्या तिजोरीत जमा करतात. (उदा. वाहनांचा रस्ते कर, परमिट, पासिंग, रजिस्ट्रेशन फी, प्रदूषण कर, व्यवसाय कर, आदी) या करांच्या माध्यमातून वरील कर वाहनचालक भरतात. याशिवाय महाराष्ट्रात डिझेलवर सेस टॅक्स आकारला जातो. तोसुद्धा वाहनधारक भरतो. म्हणून पूर्वीप्रमाणेच रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, टँकर, बस या सर्व वाहनांना माल व प्रवासी, नवीन व नूतनीकरण परवाना शुल्क आकारावे. नूतनीकरण न केलेल्या परवानाधारकास पूर्वीप्रमाणे शंभर रुपयांचे दंडात्मक शुल्क आकारावे, अशी मागणी आहे. त्यामुळे शासनाने ही वाढीव, नवीन व नूतनीकरण परवाना शुल्क व परवाना नूतनीकरण न केलेल्या वाहनधारकांवरील दंडात्मक कारवाई रद्द न केल्यास महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन पुकारू, असा इशारा यावेळी दिला.यावेळी सुभाष जाधव, सतीशचंद्र कांबळे, राजू जाधव, सुभाष शेटे, विलास माताडे, चंद्रकांत भोसले, आदींची भाषणे झाली. सोमवारी (दि. ७) रात्री १२ वाजल्यापासून सर्व रिक्षा, माल व प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या बंद राहतील आणि मंगळवारी सकाळी ११ वाजता मध्यवर्ती बसस्थानकापासून आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी सर्वांनुमते घेण्यात आला. निदर्शनांत रिक्षाचालक सेना, बस ओनर्स असोसिएशन, करवीर आॅटो रिक्षा, खासगी बस वाहतूक, आदर्श टेम्पो युनियन, शाहूवाडी तालुका मोटार मालक, शिरोली एमआयडीसी ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, गांधीनगर ट्रान्स्पोर्ट, कोल्हापूर गुड्स ट्रान्स्पोर्ट, जिल्हा वाळू वाहतूक, मालट्रक वाहतूकदार, राधानगरी तालुका बॉक्साईट, महाराष्ट्र रिक्षाचालक सेना, इचलकरंजी स्कूल बस, कोल्हापूर स्कूल बस, शेअर-ए-रिक्षा, काँग्रेस आॅटो हिंदुस्थान रिक्षा, कॉमन मॅन, राष्ट्रवादी रिक्षा, जयहिंद मोटार मालक संघ, आदी संघटनांचे पदाधिकारी यांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)स्कूल बसही बंदसध्या परीक्षेचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी एक दिवस पालकांनी पाल्याला शाळेत सोडावे व रिक्षाचालक, स्कूल बस चालकांना सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.