शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

मोठा दिलासा! कोल्हापुरातील 'तो' दहा वर्षाचा मुलगा 'ओमायक्रॉन' निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 7:18 PM

या मुलांचा अहवाल ओमायक्रॉन निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. मात्र तो डेल्टा पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोल्हापूर : येथील हिंमतबहाद्दर परिसरात ऑस्ट्रेलियातून आलेल्या दहा वर्षाचा मुलांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्या मुलाचा स्वॅब पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला. आज शनिवारी त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून तो ओमायक्रॉन निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्याचा अहवाल डेल्टा पॉझिटिव्ह आला आहे.  यामुळे आरोग्य यंत्रणेसह कोल्हापूरवासियांना मोठा दिलासा मिळाला.

मूळचे कोल्हापूरचे असलेले तसेच व्यवसायाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील पाच व्यक्ती ३ डिसेंबरला भारतात आल्या. विमानतळावर या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यावेळी सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यानंतर त्यांना विमानतळावरून सोडण्यात आले.

कोल्हापूर शहरात या पाचही व्यक्ती पोहचल्यानंतर त्यांची माहिती राज्य आरोग्य यंत्रणेने महानगरपालिका प्रशासनास कळविली. दि. ८ डिसेंबरला महानगरपालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयात सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी चौघांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे तर दहा वर्षाच्या मुलाचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह असल्याचे सोमवारी (दि १३ डिसेंबर) स्पष्ट झाले.

ते परदेशातून आले असल्यामुळे त्याची शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे ओमायक्रॉन संशयित म्हणून चाचणी करण्यासाठी त्यांचा स्वॅब पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला होता. आज त्याचा अहवाल प्राप्त झाला असून तो ओमायक्रॉन' निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन