शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

kolhapur- गुड फ्रायडेनिमित्त ख्रिस्तीबांधवांची कारागृहातील बंदीजनांसाठी प्रार्थना, बेघरांना वस्तूंचे वाटप

By संदीप आडनाईक | Published: April 07, 2023 5:11 PM

कोल्हापूर : ख्रिस्ती बांधवांचा पवित्र समजला जाणारा गुड फ्रायडे हा सण शुक्रवारी धार्मिक वातावरणात पार पडला. कोल्हापूरातील न्यू शाहूपुरी ...

कोल्हापूर : ख्रिस्ती बांधवांचा पवित्र समजला जाणारा गुड फ्रायडे हा सण शुक्रवारी धार्मिक वातावरणात पार पडला. कोल्हापूरातील न्यू शाहूपुरी येथील वायल्डर मेमोरियल चर्च, नागाळा पार्क येथील ख्राईस्ट चर्च, विक्रमनगर ख्रिस्ती समाज चर्च, ब्रह्मपुरी येथील पवित्र सुवार्तिकांचे उपासना देवालय, सेवन्थ डे चर्च, ऑल सेंट्स चर्च यांसह शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी गुड फ्रायडेची प्रार्थना केली.प्रभू येशू ख्रिस्तांनी वधस्तंभावर उच्चारलेल्या सात उद्गारांवर आधारित उपदेश यावेळी विविध चर्चमधून देण्यात आला. क्वायर ग्रुपकडून गुड फ्रायडेची विशेष स्तुतीपर गीतेही यावेळी गाण्यात आली. न्यू शाहूपुरी येथील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये सकाळी इंग्रजीतून भक्ती घेतल्यानंतर मुंबईहून आलेले विशेष प्रवचनकार रेव्हरंड बिशप शिरिष आहाळे यांनी मुख्य संदेश दिला. या विशेष प्रार्थनेसाठी चर्चच्या आवारात स्क्रीनची व्यवस्था केली होती.यावेळी रेव्हरंड डी. बी. समुद्रे, सियोन काळे, अशोक गायकवाड, आनंद म्हाळुगेकर, विक्रम चोपडे, सुलभा जाधव, मनीषा गायकवाड, रजनीकांत चोरगे, संदीप थोरात, अमोस अष्टेकर, अतुल रुकडीकर यांच्यासह भाविक उपस्थित होते. तत्पूर्वी कळंबा कारागृहातील बंदीजनांसाठी आनंद म्हाळुंगेकर, सियोन काळे यांनी प्रार्थना म्हटली. आज, शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता पुण्याच्या अमित त्रिभुवन यांच्या क्रूसाच्या कवितांचा कार्यक्रम होणार आहे.नागाळा पार्क येथील ख्राईस्ट चर्चमध्ये अहमदनगर येथील रेव्हरंड अभिजित तूपसुंदरे यांनी विशेष सात उद्गारांवरील संदेश दिला. डॉ. सुशील कांबळे यांनी भक्ती सांगितली. याशिवाय कोल्हापूर जिल्हा ख्रिस्ती संघ आणि कोल्हापूर युवक ख्रिस्ती मंचतर्फे विशेष प्रार्थना घेण्यात आल्या. विक्रमनगर चर्च येथे मेघनाथ पवार, संजय धनवडे यांनी उपदेश केला.ख्रिश्चन एकता मंचतर्फे एकटी आणि बेघर अनाथ संस्था तसेच वीटभट्टी कामगारांसाठी प्रार्थना म्हणण्यात आली. त्यांना फळांचे वाटप आणि गरजेच्या वस्तूही देण्यात आल्या. यावेळी जिझस हा चित्रपट दाखवण्यात आला. तसेच गिडिओंसमार्फत नवा करार देण्यात आले. संस्थेचे कार्याध्यक्ष अमित भोरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जॉन विजय भोरे, पास्टर जोशूवा सावंत, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष पियूष रुकडीकर, अमोस मस्के, मदन मोरे उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर