दत्तात्रय धडेलजोतिबा : नवरात्रोत्सवाच्या पाचव्या माळेला जोतिबाची कमळ पुष्प पाच पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा बांधण्यात आली. दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.नवरात्रोत्सवात जोतिबाची वैविध्यपूर्ण महापूजा बांधल्या जातात. आजच्या पाचव्या माळेला कमळ पुष्प पाच पाकळ्यातील महापूजा बांधण्यात आली. आजची पूजा अंकुश दादर्णे, आदीनाथ लादे, दगडू भंडारी, सदाशिव भोरे, बाबासाहेब लादे यांनी बांधली. पुजेला आध्यात्मिक व शास्त्राचा आधार आहे.नवरात्रीमध्ये कमळ भैरवाने काशीहून सुवर्ण कमळे आणून श्री जोतिबाची पूजा बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यांचे स्मरण म्हणून आजही रंगीबेरंगी कपडयाच्या कमळ पुष्प पाकळ्या करून ही पूजा बांधली जाते. तीन पाकळ्या या त्रिदेवात्मक व दोन पाकळ्या या सगुण निर्गुण अवताराचे प्रतिक आहे.सकाळी १० वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत धुपारती सोहळा निघाला. पाचव्या माळेला भाविकांनी जोतिबा दर्शनासाठी मोठी गर्दी केली. तेल अर्पण करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची गर्दी वाढू लागली आहे . मंदिरात रात्री भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री १२ .३० वाजता त्रिकाळ आरती करून १ वाजता मंदिराचे दरवाजे बंद केले.महाघंटेचा नाद करून मंदिराचे दरवाजे उघडेनवरात्रोत्सव काळात जोतिबाचे मंदिर २२ तास खुले असते. पहाटे ३ वाजता महाघंटेचा नाद करून मंदिराचे दरवाजे उघडले जातात. रात्री १ वाजता मंदिर बंद केले जाते. इतर वेळी मंदिर पहाटे ४ वाजता उघडले जाते आणि रात्री ११ वाजता बंद होते.
Navratri2022: पाचव्या माळेला सोहन कमळपुष्पात जोतिबाची राजेशाही महापूजा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 11:55 AM