शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरात म्हशींचा 'रोड शो', आमदार ऋतुराज पाटलांनी गाडीवर बसून पळवली म्हैस -video

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 1:59 PM

शोमध्ये एका म्हशीच्या पाठीवर तिच्या मालकाने नक्षीदार रचना केली होती. म्हशीच्या पाठीवरील केस कापताना त्यावर नक्षी काम केल्याने ही म्हैस आकर्षक दिसत होती. तसेच ह्या म्हशीला पाहणाऱ्यांची वाहवा ही मिळत होती.

दुर्वा दळवीकोल्हापूर : दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरातील कसबा बाबड्यात म्हशींच्या रोड शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनामुळे गेली दोन वर्षे या स्पर्धा बंद होत्या. त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात या स्पर्धा पार पडल्या. सजल्या धजलेल्या म्हैशी आणि रोड शो पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे आमदार ऋतुराज पाटलांनी गाडीवर बसून म्हैस पळवली.कोल्हापूरच्या कसबा बावडा, सागरमाळ, पंचगंगा घाट, पाचगाव या ठिकाणी पाडव्यानिमित आकर्षक अशा सजून धजून म्हैशी आणल्या जातात. तिथे त्यांचा दिमाखदार रोड शो दरवर्षी दिवाळी पाडव्याला केला जातो. म्हैस मालक या दिवशी आपल्या म्हशींना न्हाऊ माखु घालून त्यांची शिंगे रंगवतात, गुलाल लावतात, विविध रंगांची नक्षी म्हशीवर काढून, पायांत घुंगरू बांधून रोड शोसाठी आणतात. हलगीच्या ठेक्यावर इथे या रोड शोचा रंगतदार कार्यक्रम होतो. म्हैस मालक दुचाकीवर बसून आपल्या म्हशींचा रोड शो करतात म्हणजेच त्यांना लाल रंगाचे, काळ्या रंगाचे कापड दाखवून आपल्या गाडीच्या मागवून पळवतात असा हा रोड शो सादर होतो.कसबा बावडा परिसरात आजही ही परंपरा जपली जाते. साधारणपणे तीन ते चार लाख किंमत असलेल्या ह्या सगळ्या म्हशी असतात. हा रोड शो पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषी वातावरणात हा रोड शो पार पडला.

नक्षीदार पाठीची म्हैशीने मिळवली वाहवाकसबा बावड्यातील रोड शोमध्ये एका म्हशीच्या पाठीवर तिच्या मालकाने नक्षीदार रचना केली होती. म्हशीच्या पाठीवरील केस कापताना त्यावर नक्षी काम केल्याने ही म्हैस आकर्षक दिसत होती. तसेच ह्या म्हशीला पाहणाऱ्यांची वाहवा ही मिळत होती.

आमदार ऋतुराज पाटील यांनी गाडीवर बसून म्हैस पळवलीया रोड शोमध्ये मुख्यत: म्हैस मालक आपल्या म्हैशींना दुचाकीवर बसून सायलेंसरच्या आवाज काढत, लाल कापड फाकवून त्यांना आकर्षित करत पळवतात. कसबा बावड्यातील या रोड शोला आमदार ऋतुराज पाटील यांनी उपस्थिती लावली होती. त्यांनतर त्यांनी ही दुचाकीवर बसून या रोड शोचा आनंद लुटला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDiwaliदिवाळी 2022Ruturaj Patilऋतुराज पाटील