शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांना अनोखे अभिवादन, १२ तासांत १०२ किलो तांदळातून रेखाटली भव्य रांगोळी

By संदीप आडनाईक | Published: May 06, 2024 3:20 PM

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १०२ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सोमवारी टाऊन हॉल येथील नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळावर ...

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १०२ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सोमवारी टाऊन हॉल येथील नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळावर राज्यभरातून आलेल्या शाहूप्रेमींनी दिवसभर अभिवादन केले. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचेही अनेकांनी दर्शन घेतले.नर्सरी बागेतील राजर्षी शाहूंच्या समाधी स्थळांवर सोमवारी सकाळी शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगांवकर, मालोजीराजे, मधुरिमाराजे, यशराजे, यशस्विनी राजे यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले. शाहू सलोखा मंचाच्या वतीने १०२ सेकंद शांतता पाळून महाराजांना आदरांजली वाहिली. यावेळी राजर्षी शाहू महाराज की जय, अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष माजी महापौर आर. के. पोवार, शिवसेना सहसंपर्क नेते विजय देवणे, आपचे प्रदेश सचिव संदीप देसाई, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळिक, निवृत्त कॅप्टन शिवाजीराव महाडकर, अतुल दिघे, सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, बी. एल. बरगे, मेघा पानसरे, रघू कांबळे माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी, उपस्थित होते.

१०२ किलो तांदळातून रांगोळीशाहू महाराजांनी सामाजिक समतेचा प्रसार केला, तसेच शेती आणि शेतकऱ्याला महत्त्व दिले म्हणून बीडचा कलाकार उद्देश गोवर्धन पघळ यांनी समाधी स्थळ परिसरात १२ तासांत १०२ किलो तांदळातून शाहू महाराजांची प्रतिमा असलेली भव्य रांगोळी काढली. त्याला विजय सगर, विश्वविजय कांबळे, रोहित कांबळे, अजिंक्य घाडगे, रतन सूर्यवंशी यांनी मदत केली. शाहू छत्रपतींसह मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. आमदार ऋतुराज पाटील, संदीप बिरांजे, विश्वविक्रम कांबळे यांनी त्यांना सहकार्य केले.

व्हिडीओद्वारे रेखावार यांनी वाहिली आदरांजलीतत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही कोल्हापुरातून बदली झाली तरी सोमवारी सकाळी त्यांनी सीए आदित्य बेडेकर यांच्या मोबाइलवरून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शाहू यांना आदरांजली वाहिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर