कोल्हापूर : उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न देता त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढण्यास सांगितले जात आहे. यामुळे पालकांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया किचकट असल्याने पालकांना त्याचा त्रास होत आहे. मिळणार दीडशे रुपये व त्यासाठी दीड हजार खर्चून बँक खाते काढण्याचे दिव्य पार पाडावे लागत आहे.
पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुट्टीत शालेय पोषण आहार प्रत्यक्ष दिला जात होता; पण यामध्ये बदल करून सरकारने आहाराऐवजी विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार आहे. यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत विद्यार्थ्यांच्या नावे खाते उघडणे बंधनकारक केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या बहुतांशी शाखांमध्ये गर्दी आहे. कोरोनामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या नावे खाते उघडताना पालकांना हेलपाटे मारावे लागत आहे. खात्यासाठी विविध प्रकारची कागदपत्रे गोळा करतानाही धावपळ करावी लागत आहे.
ग्राफ
कोणत्या वर्गात किती विद्यार्थी ?
पहिली -५२३८९
दुसरी -५३८८४
तिसरी-५६१६७
चौथी- ५६५६३
पाचवी -५७११८
सहावी -५६७५०
सातवी -५६२५८
आठवी -५७०६५
पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार - १५६
सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार -२३४
चौकट
बँक खाते उघडण्यासाठी लागणार हजार रुपये
शालेय पोषण आहाराऐवजी त्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ते पैसे कधी मिळणार अनिश्चित आहे. परिणामी आहाराच्या मिळणाऱ्या पैशापेक्षा बँक खाते उघडण्यासाठी पैसे अधिक खर्च होत आहेत. बँकेच्या खात्यावर कमीत कमी एक हजार रुपये नसतील तर दंड आकारला जातो. खाते काढताना दीड हजारांपेक्षा अधिक खर्च होतोच. शिवाय पुढे खाते चालू ठेवण्यासाठी एक हजारांपेक्षा अधिक रक्कम शिल्लक ठेवावे लागणार आहे. यामुळे गरीब, सामान्य पालकांची आर्थिक कोंडी होत आहे.
पालकांची डोकेदुखी दोन पालकांच्या प्रतिक्रिया
कोट
सरकारकडून शालेय पोषण आहारासाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर नाममात्र पैसे जमा करणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढण्यासाठी एक हजार रुपये आणि इतर खर्च येत आहे. यामुळे पालकांची नवी डोकेदुखी बनली आहे.
-विजय दिवाण, पालक
माझी मुलगी आठवीला आहे. तिला पोषण आहाराचे पैसे मिळणार म्हणून बँकेत खाते काढण्यास सांगितले. प्रत्यक्षात अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. खाते उघडण्याची प्रक्रिया किचकट होती. यामुळे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडताना त्रास झाला.
-दिलदार मुजावर, पालक
शिक्षणाधिकाऱ्यांचा कोट
सरकार उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न देता त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
-एस. के. यादव, शिक्षण प्रशासन अधिकारी, महापालिका