उपोषकर्त्यांनी मांडलेले मुद्दे असे, या प्रकल्पाची निविदा मंजूर करण्यासाठी १८० दिवस लागले, प्रकल्पाची मूळ किंमत ६.०८ कोटी होती. सुधारित किंमत १३.५३ कोटी झाली आहे, निविदा १४.१४ टक्के जादा दराने मंजूर केली आहे. ६.८१ कोटी अतिरिक्त दायित्वास मंजुरी दिली, १४ व्या रनिंग बिलापर्यंत ११.८५ कोटी रुपये ठेकेदारास आदा केले आहेत, निविदा मंजुरीनंतर प्रकल्पाच्या नकाशामध्ये बदल करून धरणाच्या उंचीमध्ये वाढ झाल्याचे दाखवून संकल्पचित्र बदलून प्रकल्पाच्या व्याप्तीमध्ये वाढ केली आहे, धरणाच्या सांडवा भागातील खोदकामात निघालेल्या अत्यंत निकृष्ट दर्जाचा दगड पिचिंग कामासाठी वापरला आहे.
अशा अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने शासनाची फसवणूक केली असल्याचे उपोषकर्ते यांनी सांगितले. शासनाला जाग आणण्यासाठी शहर अध्यक्ष शरद मोरे यांनी एकदिवसीय उपोषण केले आहे.