शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
3
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
4
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
5
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
6
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
7
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
8
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
10
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
11
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
12
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
14
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
15
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
16
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
17
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
18
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
19
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
20
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे

चोर समजून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू, कोल्हापुरातील इस्पुर्ली येथे घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 1:30 PM

लोखंडी पाईपने केली होती मारहाण

चुये : इस्पुर्ली (ता. करवीर) येथे चोरी करण्यासाठी चोर आल्याच्या संशयावरून दुकान मालकाने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नानासो आनंदा चौगले (वय ४७, रा. इस्पुर्ली, ता. करवीर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील दिंगबर तुकाराम मगदूम (वय ३३ ) यांचे इस्पुर्ली येथे गारगोटी मार्गावरती फॅब्रिकेटर्सचे दुकान आहे. या दुकानाच्या आवारात उघड्यावर लोखंडी पाईप व इतर साहित्य ठेवलेले आहे. मंगळवारी (दि.२२) रात्री नऊच्या सुमारास नानासो हे दुकानाच्या आवारात गेले असता, चोरीसाठी आल्याच्या संशयावरून दिगंबर यांनी लोखंडी पाईपने मारहाण केली होती. या मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाली होती. ही घटना चौगले यांच्या नातेवाइकांना समजल्यानंतर त्यांनी नानासो यांना उपचारांसाठी सीपीआर येथे दाखल केले होते. बुधवारी (दि.२३) सकाळी त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मृताचे नातेवाईक संदीप विलास चौगले यांनी माऊली फॅब्रिकेटर्सचे मालक दिगंबर मगदूम यांनी केलेल्या मारहाणीत नानासो यांचा मुत्यू झाल्याची फिर्याद इस्पुर्ली पोलिस ठाण्यात दिली आहे. रात्री उशिरा दिगंबर मगदूम याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. घटनास्थळी करवीरचे उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी व सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी भेट दिली. मृत नानासो चौगले हे शेती करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई्- वडील व दोन मुले असा परिवार आहे. अधिक तपास इस्पुर्लीचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस