घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, निखिल आणि विनायक हे निपाणीहून आपल्या गावी मोटारसायकल (एमएच १४- एचटी ६७६५)वरून जात होते. सोनगे प्रवेशद्वाराजवळ कार आणि त्यांच्यात जोरदार धडक झाली. यामध्ये निखिल हा जागेवरच बेशुद्ध झाला होता. त्यांना मुरगूड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सीपीआरकडे हलविण्यात आले होते. अधिक तपास मुरगूड पोलीस करत आहेत.
................
गतिरोधक, हेल्मेट असते तर....
सोनगे गावानजीक गतिरोधक केलेला नाही. तसेच ते बुलेटवर असल्याने त्यांचा वेगही अति होता. अपघातानंतर निखिलच्या कानातून रक्त वाहत होते. त्यामुळे हेल्मेट असते तर त्याचा जीव वाचला असता. नशीब बलवत्तर म्हणूनच इतक्या भीषण अपघातानंतरही विनायकचा जीव वाचल्याची घटनास्थळी चर्चा सुरू होती.