शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात गळा आवळून एकाचा खून, संशयितांचा शोध सुरू

By उद्धव गोडसे | Published: September 26, 2024 1:25 PM

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानकातील एका दुकानाच्या पायरीवर गळा आवळून तरुणाचा खून केल्याचा प्रकार गुरुवारी (दि. २६) सकाळी उघडकीस आला. ...

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानकातील एका दुकानाच्या पायरीवर गळा आवळून तरुणाचा खून केल्याचा प्रकार गुरुवारी (दि. २६) सकाळी उघडकीस आला. संदीप रामगोंडा शिरगावे (वय ३५, रा. चिंचवाड, ता. शिरोळ) असे मृताचे नाव असल्याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. संशयितांच्या शोधासाठी शाहूपुरी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एसटी प्रोव्हिजन स्टोअरच्या पायरीवर एक तरुण बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती एसटीच्या अधिका-यांकडून मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, तो मृत झाल्याचे लक्षात आले. जवळ त्याची बॅग होती. गळ्यावर दोरीचे व्रण दिसत असल्याने गळा आवळून त्याचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.त्याच्याकडे मिळालेल्या एका डायरीत असलेल्या नावावरून पोलिसांनी त्याची ओळख पटवली. त्याचे नाव संदीप शिरगावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सीपीआरमध्ये पाठवण्यात आला.

पोलिसांकडून त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुकानासमोर झोपण्यासाठी झालेल्या वादातून त्याचा गळा आवळला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला.

गडहिंग्लजमध्ये होता मुक्कामचिंचवाड येथील शिरगावे हा ट्रकचालक होता. दारू पिऊन घरात गोंधळ घालत असल्याने चार महिन्यांपूर्वी त्याची पत्नी आणि मुलगा माहेरी गडहिंग्लज येथे गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून तोदेखील सासुरवाडीत राहत होता, अशी माहिती चिंचवाड येथून मिळाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस