शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

तंबाखू दिली नाही म्हणून दगडाने ठेचून निर्घृण खून, घरगुती गणेश विसर्जनादिवशीच कोल्हापुरात उडाली खळबळ

By तानाजी पोवार | Published: September 05, 2022 3:49 PM

आज, घरगुती गणेश विसर्जनासाठी नागरिक घराबाहेर पडत असतानाच सकाळच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह रस्त्याकडेला आढळला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

कोल्हापूर : तंबाखू खिशात असताना नाही म्हणून खोटं बोलल्याच्या रागातून दोघांनी एकाचा लाकडी बांबूने व दगडाने ठेचून निर्घृण खून केला. शंकर आकाराम कांबळे (वय ५५ रा. माळापुडे, ता. शाहुवाडी) असे मृताचे नाव आहे. आज, सोमवारी पहाटे शिवाजी उद्यमनगर परिसरात कोटीतीर्थ तलावानजीक ही घटना घडली.आज, घरगुती गणेश विसर्जनासाठी नागरिक घराबाहेर पडत असतानाच सकाळच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह रस्त्याकडेला आढळला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित शुभम अशोक शेंडगे (वय २८ रा. यादवनगर) याला ताब्यात घेतले. तर रोहित अजय सूर्यगंध (२७ रा. यादवनगर) चा शोध घेत आहेत.घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, शंकर कांबळे हे आठ दिवसांपूर्वी कोल्हापुरात आपल्या मुलीकडे आले होते. सोमवारी पहाटे ते कोटीतीर्थ परिसरात फिरत होते. यावेळी शुभम शेंडगे व रोहित सूर्यगंध या संशयितांनी त्यांच्याकडे तंबाखूबाबत विचारणा केली. कांबळे यांनी तंबाखू नसल्याचे सांगितले. संशयित दोघांनी कांबळे यांना पकडून अंगझडती घेतली, त्यांच्या खिशात तंबाखू आढळली. खोटे बोलल्याच्या रागातून दोघांनी त्यांना बेदम मारले. शेजारील दगड व लाकडी बांबू डोक्यात घालून ठेचले. रक्तबंबाळ अवस्थेत तेथेच टाकून पलायन केले. अतिरक्तस्त्रावामुळे कांबळे यांचा मृत्यू झाला.सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पो. नि. संजय गोर्ले, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे घटना उघडपोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्या भागातून रोहित व शुभम फिरताना कॅमेऱ्यात कैद झाले. त्यावरून छडा लागला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस