सातारा : महामार्गावर घडणाऱ्या अनुचित प्रकारांवर बारिक लक्ष ठेवण्सासाठी आनेवाडी टोलनाक्यावर उच्च प्रतीचे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. जवळपास एक किलोमीटर अंतरावरील वाहनातील प्रवाशांसह त्यांच्या हालचालीही टिपण्याची क्षमता या कॅमेऱ्यांमध्ये आहे. पुणे-बंगळूर महामार्गावर अनेकदा अपघात, दरोडे, लूटमार असे प्रकार घडत असतात. दोन महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलाला पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यावेळी आनेवाडी टोलनाक्यावर लावलेल्या कॅमेऱ्यामुळेच तो आरोपी सापडला होता.मात्र, यापूर्वीचे कॅमेरे कमी क्षमतेचे असल्यामुळे वाहनांमधील बसलेल्या व्यक्ती स्पष्टपणे दिसत नव्हत्या. म्हणूनच सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर टोलनाक्यावर दोन्ही बाजूला प्रत्येकी साडेतीन लाख रूपये किमतीचे उच्च प्रतीचे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे आता महामार्गावरील बारिकसारिक हालचालींवरही करडी नजर ठेवता येणार आहे.महामार्गावरील एक किलोमीटरपर्यंतच्या कक्षेतील हालचाली टिपण्याची क्षमता या कॅमेऱ्यांमध्ये आहे. एवढेच नव्हे तर रात्रीच्या वेळीही गाडीची नंबरप्लेट, गाडीत बसलेले प्रवासी स्पष्टपणे दिसणार असल्याने अनुचित घटना थांबतील, अशी माहिती टोल प्लाझाचे वरिष्ठ व्यवस्थापक विवेक शर्मा यांनी दिली. (प्रतिनिधी)या टोलनाक्यावर दहा लेन असून प्रत्येक लेनवर सुरक्षिततेच्या दृष्टीने कॅमेरे बसविण्यात आले आहेत. टोलनाक्यावर टोल मॅनेजमेंटचे १५० आणि रिलान्स कंपनीचे १३० असे २८० कर्मचारी कार्यरत असून प्रत्येक वाहनाला सुरक्षा पुरविण्याच्या दृष्टीने कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
कॅमेऱ्यात एक किलोमीटरची दृश्ये
By admin | Published: November 17, 2014 10:43 PM