गोकुळ शिरगाव : गोकुळ शिरगाव आझादनगरमधील महालक्ष्मी कॉलनी येथे प्रेम प्रकरणातून दोघा हल्लेखोर तरुणांनी चाकूने वार करून श्रीनाथ बसाप्पा मेलकेरी, वय २७, रा. आझादनगर याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी संशयित आरोपी शुभम झाडे, वय २४, तर साहिल वाघमारे २१, रा. आझादनगर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. फिर्यादी सावित्री बसाप्पा मेलकेरी यांनी केलेल्या फिर्यादीनुसार गोकुळ शिरगाव पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.श्रीनाथ मेलकेरी व शुभम झाडे याचा मित्र साहिल वाघमारे हे गेल्या दहा वर्षांपासून गोकुळ शिरगाव येथील आझादनगर येथे राहतात. शुभम याच्या घरातील एकाशी श्रीनाथ मेलकेरी याचे सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. श्रीनाथ मेलकेरी हा एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो. मंगळवारी रात्री श्रीनाथ हा एका कट्ट्यावर मोबाइल बघत बसला होता. भागातील वीज गेल्याने अंधाराचा फायदा घेऊन शुभम व त्याचा मित्र साहिल वाघमारे यांनी श्रीनाथ याला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच शुभमने चाकूने वार करून गंभीर जखमी केले. श्रीनाथला उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल केले आहे. अधिक तपास सपोनि तबरसूम मगदूम करीत आहेत.
Kolhapur: प्रेम प्रकरणातून एकावर जीवघेणा हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 12:16 IST