शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

गणेशोत्सवासाठी पोलिसांची एक खिडकी योजना

By admin | Published: August 23, 2016 12:22 AM

प्रशासकीय यंत्रणा सज्ज : मंडळांची धांदल सुरू; मंडप उभारणीचे काम यु्द्धपातळीवर

कोल्हापूर : अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची धांदल शहरात सुरू झाली आहे. प्रशासकीय यंत्रणाही यासाठी सज्ज झाली आहे. पोलिस प्रशासनाने गणेश मंडळांना परवाना आणि ‘महावितरण’ने तात्पुरती वीजजोडणी घेण्याचे आवाहन केले आहे. एकंदरीत, शहरात गणेशोत्सवाचे वातावरण सुरू झाले आहे.यंदा पाच सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यासाठी गणेश तरुण मंडळांनी मंडप घालण्यास सुरुवात केली आहे, तर गणेशोत्सवातील परवान्यांसाठी शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयाने शनिवार पेठेतील कार्यालयात ‘एक खिडकी योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत गणेश मंडळाचा परवाना, कोल्हापूर महापालिका व शहर वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर यांचा एकत्रित परवाना देण्याचे काम सुरू केले आहे. सर्व गणेश मंडळांनी रीतसर परवाना अर्ज भरून परवाना घेणे बंधनकारक आहे.तसेच गणेश मिरवणूक मार्गांवरील रस्ते सुस्थितीत करून त्यांचे पॅचवर्क करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे; पण पावसामुळे पॅचवर्क करण्यात आलेले नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत ऊन पडल्यास विशेषत: गंगावेश-कुंभार गल्ली, पापाची तिकटी, महाद्वार रोड, धोत्री गल्ली, शाहूपुरी कुंभार वसाहत, आदी रस्त्यांवरील पॅचवर्क करण्याचे नियोजन सुरू केले आहे. गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी एका खड्ड्याचा दर प्रशासनाने २५० रुपये ठेवला आहे.त्याचबरोबर गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते. सामाजिक व लोकशिक्षण करणारे देखावे उभारले जातात. मात्र, त्यासाठी अनधिकृत वीज वापरणे हा कायद्याने गुन्हा आहे. तसेच जीवित व वित्तहानी होण्याचा गंभीर धोका असतो. त्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळांनी उत्सवासाठी तात्पुरत्या स्वरूपाची अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. या धार्मिक कार्यक्रमासाठी महावितरणकडून तीन रुपये ७१ पैसे प्रतियुनिट इतक्या माफक दरात वीजपुरवठा करण्यात येणार आहे. इतर कोणत्याही वर्गवारीपेक्षा हा दर कमी असणार आहे. मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातूनही महावितरणच्या सर्व सेवा २४ तास उपलब्ध आहेत. महावितरण मोबाईल अ‍ॅप व संकेतस्थळावरून, मध्यवर्र्ती ग्राहक सुविधा केंद्र अथवा नजीकच्या शाखा कार्यालयातून तात्पुरत्या नवीन वीजजोडणीकरिता अर्ज दाखल करावेत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास तातडीने कोटेशन देण्याच्या व ते भरल्यावर त्वरित वीजजोडणी देण्याच्या सूचना सर्व कार्यालयांना दिल्या आहेत. जेणेकरून गणेश मंडळांना तत्काळ वीजजोडणी मिळणार आहे. सार्वजनिक उत्सव मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेऊन सुरक्षितपणे गणेशोत्सव साजरा करावा.- शंकर शिंदे, मुख्य अभियंता, महावितरण, कोल्हापूर परिमंडल.गणेश मिरवणूक मार्गांवरील रस्त्यांचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. हे रस्ते सुस्थितीत करून पॅचवर्क करणार आहे.- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, कोल्हापूर महापालिका.शहरातील गणेश तरुण मंडळांनी लवकरात लवकर नोंदी करून घ्याव्यात. या ‘एक खिडकी योजने’चा लाभ घ्यावा.- भारतकुमार राणे, शहर पोलिस उपअधीक्षक, कोल्हापूर.‘आयएसआय’ प्रमाणित वायर वापरा...गणेश मंडळांनी त्यांचे अंतर्गत वायरिंग अधिकृत ठेकेदाराकडूनच करावी; ती विद्युत निरीक्षकांकडून तपासून घ्यावी. त्यास अर्थिंग करावे व ‘ईएलसीबी’चा वापर करावा. आयएसआय प्रमाणित वायर वापराव्यात. वायरिंगचे जोड उघडे न ठेवता त्यावर इन्शुलेशन करावे. देखावे व मंडप वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतर ठेवून उभारावेत. महावितरणच्या वीज यंत्रणेशी छेडछाड करू नये. तसे केल्यास विद्युत कायदा २००३ नुसार कारवाई होऊ शकते. विजेसंबंधीच्या तक्रारीसाठी महावितरणच्या १८००२३३३४३५ व १८००२००३४३५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.एक महिना राहणार मंडपगणेशोत्सव सुरू होण्याअगोदर १५ दिवस आणि त्यानंतर १५ दिवस असे एकूण ३० दिवस काही मंडळांनी मंडप घातले आहेत. त्यामुळे या मंडप मार्गांवरील वाहतुकीला अडथळा होत आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया शहरवासीयांतून उमटत आहेत.