गेल्या सोमवारी ‘एमआयडीसी’च्या मुंबईतील आयटी टीमने तांत्रिक अडचण असल्याने सर्व्हरचा वापर करू नये, ही अडचण असेपर्यंत सर्व्हरचा वापर केल्यास संगणक प्रणालीमध्ये व्हायरसचा प्रवेश होईल, असे सांगण्यात आले. या सर्व्हरच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राशी संबंधित विविध घटकांना अभियांत्रिकीसह अन्य स्वरूपातील सेवा ऑनलाईन पुरविण्यात येतात. मात्र, तांत्रिक अडचण असल्याने आणि आयटी टीमने सांगितल्यानुसार आम्ही सर्व्हरचा वापर थांबविला. मार्च अखेर असल्याने कर्जप्रकरणे, अन्य काही कामांची पूर्तता वेळेत करणे आवश्यक होते. त्यामुळे आम्ही वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार ऑफलाईन व्यवस्था कार्यान्वित केली. सिंगल विंडो सिस्टीम गुरुवारपासून कार्यरत झाली. ऑनलाईन स्वरूपात चालणारी सर्व कामे आम्ही ऑफलाईन पद्धतीने केली आहेत. दोन दिवस कार्यालयाला सुटी असल्याने तांत्रिक अडचण निर्गतीकरणाबाबतच्या अद्ययावत स्थितीची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडून आज, मंगळवारी उपलब्ध होईल, असे धनाजी इंगळे यांनी सांगितले.
‘एमआयडीसी’कडून एक खिडकी योजना कार्यन्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 4:13 AM