शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

कांद्याच्या दरात घसरण : बटाटा मात्र स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 3:13 PM

गेल्या चार-पाच दिवसांपासून घाऊक बाजारात सरासरी पन्नाशीपर्यंत पोहोचलेल्या कांद्याच्या दरात एकदम घसरण झाली. कांद्याला किमान १५, तर कमाल ५० रुपये, तर सरासरी ३० रुपयांपर्यंत दर राहिला. बटाट्याच्या दरात मात्र फारसा चढउतार दिसत नाही.

ठळक मुद्दे कांद्याच्या दरात घसरण : बटाटा मात्र स्थिरघाऊक बाजारात सरासरी ३० रुपयांवर दर

कोल्हापूर : गेल्या चार-पाच दिवसांपासून घाऊक बाजारात सरासरी पन्नाशीपर्यंत पोहोचलेल्या कांद्याच्या दरात एकदम घसरण झाली. कांद्याला किमान १५, तर कमाल ५० रुपये, तर सरासरी ३० रुपयांपर्यंत दर राहिला. बटाट्याच्या दरात मात्र फारसा चढउतार दिसत नाही.अतिवृष्टीमुळे खरीप कांद्याचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर झालेल्या परतीच्या पावसाने तर काढणीला आलेला कांदा जाग्यावरच कुजला. त्यामुळे आवकेवर परिणाम होऊन दरात वाढ झाली. चार-पाच दिवसांपूर्वी घाऊक बाजारातकांदा ५०, तर किरकोळ बाजारात ७० रुपयांपर्यंत पोहोचला होता.

गेल्या आठवड्यात कोल्हापूर बाजार समितीत रोज चार हजार पिशव्यांची आवक होती. त्याचा दर सरासरी ३२ रुपये होता; पण त्यानंतर दरात वाढ होत गेली. आवक चार हजार पिशव्यांच्या खाली गेल्याने घाऊक बाजारात सरासरी ५० रुपये किलोपर्यंत दर गेला; पण बुधवार (दि. ६) पासून कांद्याच्या दरात हळूहळू घसरण सुरू असून बुधवारी ६८५२ पिशव्यांची आवक झाली.दर प्रतिकिलो १५ ते ५२ रुपयांपर्यंत राहिला असला तरी सरासरी दर ३५ रुपयांवर आला. गुरुवारी कोल्हापूर बाजार समितीत ६३८५ पिशव्यांची आवक झाली. दर किमान १५, तर कमाल ५० रुपये राहिला; पण सरासरी दर ३० रुपयांपर्यंत खाली आला. बटाट्याचा दर मात्र स्थिर राहिला आहे. आवक गेल्या आठवड्यापेक्षा थोडी वाढली असली तरी सरासरी दर १५ रुपयांपर्यंत राहिला आहे.गेल्या चार दिवसांतील कांद्याचा दरदाम असा-नोव्हेंबर            आवक      पिशवी            सरासरी दर४                          ७६             २७               ४५५                          ५६             ७६               ४५६                          ६८             ५२              ३५७                          ६३             ६५              ३० 

 

टॅग्स :onionकांदाMarketबाजारkolhapurकोल्हापूर