कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी कांद्याने चांगलीच उसळी घेतली. कांद्याची आवक कमी असल्याने प्रतिकिलो ५१ रुपये दर झाला. सरासरी दरही ३५ रुपयांच्या पुढे आहे.केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने दर कोसळतील अशी भीती शेतकऱ्यांना होती. मध्यंतरी काही प्रमाणात मार्केटवर परिणामही झाला. सप्टेंबरच्या शेवटचा आठवड्यापासून दरात घसरण सुरू झाली. घाऊक बाजारात १० रुपयांपासून दर होता. कमाल दर ३५ रुपये, तर सरासरी ३० रुपयांपर्यंत होता.
गेले आठ दिवस कोल्हापूर बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होती. सरासरी ४५०० पिशव्यांची आवक व्हायची. सोमवारी मात्र आवक ३५०८ पिशव्यांवर आली. त्यामुळे दरात काहीशी तेजी आली. किमान दर १५, तर कमाल दर ५१ रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. सरासरी दरही ३५ रुपये राहिला.बटाटा मात्र स्थिरबटाट्याची आवक गेले महिनाभर स्थिर आहे. त्यामुळे दरात फारसा चढउतार दिसत नाही. सरासरी दर २८ रुपये किलोपर्यंतच राहिला आहे.बाजार समितीतील कांद्याचा दरदाम असा प्रतिकिलो-तारीख आवक पिशवी किमान कमाल५ ऑक्टोबर ५५८७ १० ३५६ ऑक्टोबर ४२६९ १० ३५७ ऑक्टोबर ५१६५ १० ३५८ ऑक्टोबर ४४५८ १२ ३६९ ऑक्टोबर ४२८० १० ३७१० ऑक्टोबर ४८६५ १० ३८१२ ऑक्टोबर ३५०८ १५ ५१