कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सेवा पूर्व परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्यावतीने दि. २१ ते २५ सप्टेंबर दरम्यान ‘प्रिपेअरिंग फाॅर काॅम्पिटिटीव्ह एक्झामिनेशन्स’ या विषयावर निमंत्रितांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यात मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव विकास खर्गे, डाॅ. नरेंद्र विसपुते, मदन नागरगोजे, आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
ऑनलाईन व्याख्यानांचा कार्यक्रम असा, मंगळवारी (दि. २१) सकाळी १०.४५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सचिव विकास खर्गे यांचे ‘स्पर्धा परीक्षेची तयारी’ यावर, तर बुधवारी (दि. २२) सकाळी १०.४५ वाजता मुंबई दूरदर्शनचे सहाय्यक संचालक नरेंद्र विसपुते यांचे ‘संरक्षण क्षेत्रात करियरच्या संधी’ यावर, गुरुवारी (दि. २३) दुपारी २.४५ वाजता महाराष्ट्र शासनाचे सचिव मदन नागरगोजे यांचे ‘युपीएससी परीक्षांची तयारी’ यावर, शनिवारी (दि. २५) सकाळी १०.४५ वाजता केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयातील अधिकारी चंदुलाल तहसीलदार यांचे ‘वनीकरण क्षेत्रात करियरच्या संधी’ यावर आणि त्याचदिवशी दुपारी १२.३० वाजता रिझर्व बँकेचे अधिकारी पवन जिंदम यांचे ‘आरबीआय परीक्षांची तयारी’ यावर व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानांचा लाभ घेण्यासाठी https://shivajiuniversity.webex.com/shivajiuniversity /j.php?MTID=m43ddae97752a697d3c420c04835bcdf7
Meeting number(acces code):25184889119
password : Suk123 या लिंकचा वापर करावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.